Join us

अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी केले गुपचूप लग्न? वाचा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:01 PM

जसलीनचा वधूवेषातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देजसलीनने तिच्या लग्नाच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. तिने सांगितले आहे की, ‘चुपके से लगजा गले, रात की चादर तले...’ हे गाणे ऐकताना जसलीनला लग्नाची फिलिंग आली आणि त्यामुळेच तिने नववधूसारखे सजून या गाण्यावर डान्स केला.

बिग बॉस या कार्यक्रमात अनुप जलोटा यांनी त्यांची शिष्य जसलीन मथारूसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा बिग बॉसच्या घरात आणि मीडियात रंगली होती. त्यांनी घरात एंट्रीच बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड म्हणून घेतली होती. पण बिग बॉस संपल्यावर त्यांनी केवळ पब्लिसिटीसाठी हा सगळा ड्रामा केला असल्याचे कबूल केले होते. पण गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. 

जसलीनचा वधूवेषातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जसलीन आणि अनुप जलोटा यांनी लग्न केले का अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे. जसलीनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात तिच्या भांगात कुंकू आणि हातात लाल चुडा दिसतोय.

एका व्हिडीओत ती बेडरूममध्ये दिसत असून ‘चुपके से लगजा गले, रात की चादर तले....’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. या व्हिडीओत जसलीन नववधूच्या रूपात आहे. जसलीनचा हे रूप पाहून तिने आणि अनुप जलोटा यांनी लग्न केले का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण या बातम्या चुकीच्या असल्याचे जसलीननेच एका मुलाखतीत सांगितले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जसलीनने तिच्या लग्नाच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. तिने सांगितले आहे की, ‘चुपके से लगजा गले, रात की चादर तले...’ हे गाणे ऐकताना जसलीनला लग्नाची फिलिंग आली आणि त्यामुळेच तिने नववधूसारखे सजून या गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्टही केला. यानंतरच जसलीन आणि अनूप जलोटा यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारु या जोडीने ‘बिग बॉस 12’मध्ये धमाल केली होती. बिग बॉसच्या घरातील या दोघांचे नाते चर्चेचा विषय बनले होते. याचे कारण म्हणजे, बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी या दोघांनी केलेला एक खुलासा. होय, गेल्या तीन वर्षांपासून आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, हे सांगून अनूप आणि जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर अनेकांनी अनूप आणि जसलीन या दोघांची खिल्ली उडवली होती तर अनेकांनी नॅशनल टीव्हीवर स्वत:चे नाते कबुल करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले होती. अर्थात पुढे काही दिवसांतच अनुप आणि जसलीन यांचे नाते केवळ बिग बॉससाठी केलेले एक नाटक होते, हे स्पष्ट झाले होते. खुद्द अनुप यांनीच घराबाहेर पडल्यावर जसलीन केवळ माझी शिष्या आहे. आम्ही केवळ रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक केले, असा खुलासा केला होता.

टॅग्स :अनुप जलोटाजसलीन मथारू