‘FAU:G’ आणि सुशांतचा संबंध काय? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:27 PM2020-09-07T17:27:37+5:302020-09-07T17:28:23+5:30
‘पबजी’ या गेमिंग अॅपवर सरकारने बंदी घालताच या अॅपच्या धर्तीवर ‘FAU:G’ हा नवा कोरा देशी अॅक्शन गेम लॉन्च करण्याची तयारी सुरु झाली.
‘पबजी’ या गेमिंग अॅपवर सरकारने बंदी घालताच या अॅपच्या धर्तीवर ‘FAU:G’ हा नवा कोरा देशी अॅक्शन गेम लॉन्च करण्याची तयारी सुरु झाली. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने स्वत: ट्विटरवर याची माहिती दिली. यासोबतच सोशल मीडियावर एक नवी चर्चा सुरु झाली. हा गेम सुशांत सिंग राजपूतच्या डोक्यातील कल्पना असल्याचा दावा सुशांतच्या अनेक चाहत्यांनी केला. मात्र आता कंपनीने हा दावा खोडून काढला आहे.
हा गेम बाजारात आणणार असणा-या nCore Games कंपनीने एक स्टेंटमेंट जारी केले आहे.
nCore Gamesचे स्टेटमेंट
Clarification @vishalgondal @dayanidhimg@akshaykumar#FAUGpic.twitter.com/qVFMjv5Crt
— nCORE Games (@nCore_games) September 7, 2020
FAU:G हा गेम दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या डोक्यातील कल्पना होती, हे चुकीचे व निराधार आहे. एनकोरची स्थापना 2019 मध्ये विशाल गोंडल व दयानयी एमजी यांनी काही लोकांसोबत मिळून केली होती. ज्यांना गेमिंग इंडस्ट्रीचा 20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. FAU:G या गेमवर 25 प्रोगामर्स, आर्टिस्ट, टेस्टर्स, डिझाईनर्सची टीम काम करत आहे. विशाल गोंडल यांनी 1998 मध्ये पहिली गेमिंग कंपनी ‘इंडिया गेम्स’ सुरु केली होती. 2012 मध्ये त्यांनी ती कंपनी डिज्नीला विकली. विशाल गोंडल यांना भारतीय गेमिंग इंडिस्ट्रीचा पितामह म्हटले जाते. अक्षय कुमार एनकोरसाठी मेंटॉरसारखा आहे. FAU:G या गेमचे सर्व कॉपीराइर्ट आणि इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स एनकोरकडे आहेत.
गेम पोस्टरवर लागला चोरीचा आरोप
FAU:G या गेमच्या पोस्टरचीही सोशल मीडियावर खिल्ली उडवली जातेय. कंपनीने हे पोस्टर फोटो स्टॉक करणा-या एका वेबसाइटवरून चोरल्याचा आरोप होत आहे. कंपनीने यावरही खुलासा केला आहे. गेमचे पोस्टर चोरीचे नाही. शटर स्टॉककडून हे पोस्टर खरेदी केले आहे. हे केवळ टीजर पोस्टर आहे. टायटल स्क्रिन व इनगेम आर्ट लवकरच रिलीज केले जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
Supporting PM @narendramodi’s AtmaNirbhar movement, proud to present an action game,Fearless And United-Guards FAU-G. Besides entertainment, players will also learn about the sacrifices of our soldiers. 20% of the net revenue generated will be donated to @BharatKeVeer Trust #FAUGpic.twitter.com/Q1HLFB5hPt
— Akshay Kumar (@akshaykumar) September 4, 2020
पबजी बॅन झाल्यानंतर 4 सप्टेंबरला अक्षयकुमारने ट्विट करत FAU:G गेम लॉन्च करत असल्याची बातमी शेअर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आंदोलनाला सपोर्ट करत आम्ही अॅक्शन गेम आणत आहोत. हा गेम सादर करताना आम्हाला अभिमान वाटतोय, असे अक्षयने म्हटले होते.