दक्षिणेकडील रसिकांसाठी अभिनयाचा देव म्हणजे रजनीकांत अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं. त्यांच्या याच गुणामुळे तमिळनाडूतील लोकांनी त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. सिनेसृष्टीतील इतके मोठे नाव असूनही अगदी नम्र स्वभाव असलेल्या रजनीकांत यांच्यावर करोडो लोक प्रेम करत असले तरी ते एका मुलाखत घेणाऱ्या मुलीवर फिदा झाले होते आणि तिच्यासोबत आज त्यांचा 37 वर्षाचा संसारही प्रेमाने अजुनही फुलत आहे.
रजनीकांत यांच्या पत्नी लता रंगाचारी या तामिळ आहेत. कॉलेजमध्ये शिकत असताना रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी गेल्या होत्या. लता यांना प्रथम पाहताच रजनीकांत त्यांच्या प्रेमात पडले. मुलाखत घेत असताना त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त लता यांच्याकडेच होते.
रजनीकांत यांनी लगेचच जवळच्या मित्रांना लताबद्दल सांगितले. हळुहळु दोघेही संपर्कात आले आणि नंतर वर्षभरातच 26th फेब्रुवारी 1981 रोजी दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
तामिळ इंडस्ट्रीतील सर्वात परफेक्ट जोडपे अशी या दोघांची आजही ख्याती आहे. त्याना सौंदर्या आणि ऐश्वर्या या दोन मुली आहेत.