बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारला (Akshay Kumar) सर्वात फिट अभिनेता म्हणून ओळखलं जातं. वेळेत झोपणं, सकाळी लवकर उठणं, रोज वर्कआऊट करणं, बॉलिवूड पार्टीजला न जाणं असं सगळंच तो फॉलो करतो. म्हणूनच वयाच्या ५६ व्या वर्षीही इतका फिट आहे. नुकताच अक्षयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो अंडरवॉटर वर्कआऊट करतोय. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
अक्षय कुमार असा अभिनेता आहे जो फिटनेसच्या बाबतीत वयाच्या ५६ व्या वर्षीही २० वर्षांच्या तरुणाला टक्कर देईल. नुकतंच त्याने व्हॉट्सअॅप चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये तो स्विमिंग पूलमधील पाण्यात वर्कआऊट करतोय. त्याने लिहिले, 'हॅपी मॉर्निंग मित्रांनो! मी आताच वर्कआऊट पूर्ण केलं. मला पूर्ण शरिराच्या वर्कआऊटसाठी पाण्यात व्यायाम करायला आवडतं. यामुळे सांधेदुखी होत नाही. आणि पाण्यात श्वास रोखून धरणं सुद्धा एक चांगला व्यायाम आहे. आता माझी फुप्फुसंही दिवसभर संघर्ष करण्यासाठी सज्ज आहेत. तुम्ही सुद्धा आज व्यायाम केला असेल तर थम्सअप द्या. चीयर्स'
अक्षयचा हाच अॅटिट्युड चाहत्यांना प्रेरणा देणारा आहे. चांगल्या प्रकारचं डाएट आणि पुरेशी, व्यायाम या साध्या सवयींनी कसं फिट राहता येतं हे त्याने दाखवून दिलंय. अक्षय रोज एक तास स्विमिंग करतो. त्यानंतर मार्शल आर्ट करतो. अक्षयचा आगामी 'मिशन रानीगंज' सिनेमा ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. याशिवाय त्याचे 'वेलकम टू जंगल', 'हाऊसफुल ५', 'हेरा फेरी 3' हे चित्रपट रांगेत आहेत.