बॉलिवूडचा डान्सिंग व अॅक्शन स्टार हृतिक रोशन नेहमी त्याच्या आगामी चित्रपट व भूमिकांमुळे चर्चेत असतो. त्याने कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून तो स्टार झाला. हृतिक शेवटचा सुपर ३० चित्रपटात झळकला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
हृतिक रोशन मुंबईत बंगल्यात रहात नसला तरी त्याचा जुहूमधील फ्लॅट पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही.
त्याचे हे घर ३ हजार स्क्वेअर फूटाचे असून हा भाग लिव्हिंग रुम आणि दोन बेडरुमध्ये विभागण्यात आला आहे.
डायनिंग टेबलची रचनाही कलात्मकरित्या करण्यात आली आहे.
हृतिकचे म्हणाल तर याचवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ असे त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत.
या दोन्ही चित्रपटांनी बंपर कमाई केली.