‘किंग’ शाहरूख खानचे इंग्रजीचे गुण तुम्ही पाहिलेत काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 10:33 AM2017-05-18T10:33:54+5:302017-05-18T16:03:54+5:30
अस्खलित इंग्रजी बोलणारा बॉलिवूडचा किंग सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘टेड टॉक्स’मध्ये सहभागी झाल्यावरून चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी होण्याचा पहिलाच ...
अ ्खलित इंग्रजी बोलणारा बॉलिवूडचा किंग सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘टेड टॉक्स’मध्ये सहभागी झाल्यावरून चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी होण्याचा पहिलाच मान मिळविलेल्या शाहरूखने त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से उलगडले आहेत. तसेच तेव्हापासून तो त्याच्या फिल्मी लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळेच अधिक चर्चेत राहत आहे. आता शाहरूखचा महाविद्यालयीन जीवनातील एक फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये शाहरूखचे इंग्रजी विषयातील गुण चक्रावून टाकणारे आहेत.
दिल्ली विद्यापीठाच्या डीयू टाइम्स या फेसबुक पेजवर शाहरूखचा अॅडमिशन फॉर्म शेअर करण्यात आला होता. या फॉर्ममध्ये शाहरूखचे इंग्रजी विषयातील नमूद केलेले गुण स्पष्टपणे दिसत आहेत. या फॉर्मवर शाहरूखला इंग्रजीत केवळ ५१ गुण मिळाल्याचे दिसत आहे. बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाºया शाहरूखची इंग्रजी बोलण्याची शैली बघितल्यास कोणीही दंग होईल अशी आहे. कारण त्याला आपण बºयाचदा अतिशय सहजतेने अन् अस्खलित इंग्रजी बोलताना बघितले आहे. त्यामुळे शाहरूखला इंग्रजीत एवढे कमी गुण कसे मिळू शकतात? यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
">दिल्ली विद्यापीठाच्या डीयू टाइम्स या फेसबुक पेजवर शाहरूखचा अॅडमिशन फॉर्म शेअर करण्यात आला होता. या फॉर्ममध्ये शाहरूखचे इंग्रजी विषयातील नमूद केलेले गुण स्पष्टपणे दिसत आहेत. या फॉर्मवर शाहरूखला इंग्रजीत केवळ ५१ गुण मिळाल्याचे दिसत आहे. बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाºया शाहरूखची इंग्रजी बोलण्याची शैली बघितल्यास कोणीही दंग होईल अशी आहे. कारण त्याला आपण बºयाचदा अतिशय सहजतेने अन् अस्खलित इंग्रजी बोलताना बघितले आहे. त्यामुळे शाहरूखला इंग्रजीत एवढे कमी गुण कसे मिळू शकतात? यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
वास्तविक शाहरूखचा महाविद्यालयीन फॉर्म व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र यावेळी पोस्ट करण्यात आलेला हा फॉर्म अधिकृत असल्याचे बोलले जात आहे. शाहरूखचा हा फॉर्म बघून अनेकांनी त्यास प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर किंग खानची यावरून खिल्लीही उडविली आहे. आता यासर्व प्रकारावर शाहरूखची काय प्रतिक्रिया येईल हे बघणे मजेशीर ठरणार आहे. पण शाहरूखचे जरी इंग्रजीतील गुण कमी असले तरी, आज त्याने मिळविलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे, हे विसरून चालणार नाही.