बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan)ने ‘बीवी हो को ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली असली, पण त्याला खरी प्रसिद्धी ‘मैने प्यार किया’मधून मिळाली. ज्यामध्ये तो मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा सांगणार आहोत. या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्री(Bhagyashree)नेही सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.
सलमान खान आणि भाग्यश्रीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला होता. ज्याने प्रचंड कलेक्शन केले होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने सलमान खानबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. अभिनेत्रीने सांगितले होते की, आम्ही चित्रपटाचे शूटिंग करत असताना तो पुन्हा पुन्हा माझ्या जवळ येऊन बसायचा आणि माझ्या कानात एकच गाणं म्हणायचा. ते आमच्याच चित्रपटातील ‘दिल दीवाना बिन सजना के’ गाणं होतं.
माझी थोडी चिडचिड झाली...
सलमानने जेव्हा हे गाणं पुन्हा पुन्हा गायला सुरुवात केली तेव्हा माझी थोडी चिडचिड झाली. त्यानंतर मी सलमानला बाजूला घेतले आणि त्याला विचारले की हे सर्व काय आहे आणि तो असे का करतो आहे? तेव्हा सलमानने मला सांगितले की त्याला सर्व काही माहित आहे, तर मी विचारले की तुला काय माहित आहे, ज्यावर त्याने सांगितले की त्याला हिमालयबद्दल माहिती आहे.
सलमान आहे खूप खोडकरखरंतर त्याला माझी आणि हिमालयाची गोष्ट एका कॉमन फ्रेंडकडून कळली होती. भाग्यश्रीने सांगितले की, तेव्हा मला समजले की, 'दिल दीवाना बिन सजना के' गाऊन सलमान मला वारंवार चिडवत होता. अभिनेत्रीने सांगितले की तो खूप खोडकर आहे.