बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांना आयसोलेशन युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे तर अभिषेक बच्चन सामान्य वॉर्डमध्ये दाखल आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दोघांच्या तब्येतीची माहिती दिली. त्यानुसार, दोघांवर उपचाराचा चांगला परिणाम पहायला मिळतो आहे आणि दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. रिपोर्टनुसार, त्यांना कमीत कमी सात दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे. तर सून व अभिनेत्री ऐश्वर्या राय व नात आराध्या दोघे घरीच उपचार घेत आहे. महापालिकेची टीम त्या दोघांची काळजी घेत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबद्दल नानावटी हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअर सर्व्हिसचे प्रमुख डॉ. अब्दुल समद अंसारी यांनी सांगितले की, जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षण दिसत आहेत. तेव्हा कदाचित हा पाचवा दिवस आहे. रुग्णांवर कोरोनाचा प्रभाव दहाव्या व बाराव्या दिवशी जास्त दिसून येतो. पण सर्वांसोबत तसे होत नाही. काही लोकांमध्ये सौम्य लक्षण असतात.
एका दुसऱ्या रिपोर्टनुसार हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या फुफ्फुसात कफ जमा झाला होता जो आता कमी झाला आहे. त्यांचे ऑक्सिजन लेवलदेखील सामान्य आहे. या रिपोर्टमध्ये हॉस्पिटलशी निगडीत सूत्रांनी सांगितले की, अमिताभ बच्चन यांच्या कमकुवत फुफ्फुस आणि मेडीकल हिस्ट्री पाहून नियंत्रित उपचार दिले जात आहे. या गोष्टीवर जास्त लक्ष दिले जात आहे की उपचाराचा कोणताही परिणाम त्यांच्या फुफ्फुसांवर झाला नाही पाहिजे.
एकूण 54 लोक बच्चन कुटुंबाच्या संपर्कात आले होते. बच्चन कुटुंबातील चार सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर 28 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी 26 लोक हाय रिस्कवर होते. या सर्व 26 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि या सर्वांना पुढील 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे. बच्चन कुटुंबाचा स्टाफ कोरोना निगेटीव्ह आढळला आहे.
तूर्तास बिग बींचे सर्व चारही बंगले सील करण्यात आले आहेत. बीएमसीने या चारही बंगल्यांना कन्टेन्टमेंट झोन घोषित केले आहे. शनिवारी अमिताभ व अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अमिताभ यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली होती.