Join us  

'हीरामंडी'तील अभिनेत्रीनं इंटिमेट सीनमुळे गमावले बरेच प्रोजेक्ट, म्हणते - मी कधीच स्क्रीनवर बोल्ड...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 12:08 PM

Heeramandi : संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यातील अनेक पात्रांना चांगलीच पसंती मिळाली.

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हीरामंडी'(Heeramandi Web Series)मध्ये सायमाची भूमिका साकारून अभिनेत्री श्रुती शर्मा (Shruti Sharma) चर्चेत आली. श्रुती शर्माने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इंटिमेसी आणि बोल्ड सीन्सबद्दल सांगितले. तिने सांगितले की, संजय लीला भन्साळी यांनी तिला वेब सीरिजमध्ये किसिंग सीन करायला लावले नाही याचा तिला खूप आनंद आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या नो इंटिमेट आणि किसिंग पॉलिसीबद्दल सांगितले.

टीव्ही शो 'नमक इश्क का' फेम श्रुती शर्माने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सीरिजमध्ये सायमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ती खूप खूश आहे. यासोबतच ती खूश आहे कारण दिग्दर्शकाने तिला या सीरिजमध्ये किसिंग सीन करायला लावले नाहीत.

बोल्ड आणि इंटिमेट सीन्समुळे सोडले प्रोजेक्ट अभिनेत्री म्हणाली, मी पडद्यावर कधीही बोल्ड होणार नाही. बोल्ड आणि इंटिमेट सीनसाठी माझा नकार आहे.अजिबात नाही. मी हे स्क्रीनवर करू शकणार नाही. मी बरेच प्रोजेक्ट सोडले कारण मला वाटले की त्या शोमध्ये बोल्ड किंवा इंटिमेट असण्याची गरज नाही.

'हीरामंडी'ची स्क्रिप्ट वाचून अभिनेत्री लागली रडूश्रुती शर्माने सांगितले की, सुरुवातीला माझ्याकडे वेब सीरिजमध्ये काही किसिंग सीन होते आणि मी ते करत नाही. त्यामुळे मी घाबरले होते, मला वाटले की हा प्रोजेक्ट माझ्या हातून जाईल. मी माझ्या घरच्यांशी बोलले. भन्साळी सरांच्या संपूर्ण टीमनेही श्रुतीला समजावले. श्रुतीने सांगितले की, 'हीरामंडी'ची संपूर्ण स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती रडू लागली कारण त्यात किसिंग सीन होते. पण मी भन्साळी सरांची आभारी आहे की त्यांनी त्या किसिंग सीन्समध्ये मी कम्फर्टेबल नाही या गोष्टीचा त्यांनी पूर्ण आदर केला.

वर्कफ्रंटश्रुती शर्माने २०१८ मध्ये 'इंडिया नेक्स्ट सुपरस्टार्स' या शोमध्ये स्पर्धक म्हणून पदार्पण केले होते. ती या शोची विजेती होती. यानंतर श्रुतीने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि टेलिव्हिजनच्या जगात आपले नाव कमावले. 'नमक इश्क का...'ने घराघरात लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने दोन चित्रपटांमध्येही काम केले आहे. तेलुगू भाषेतील चित्रपटांशिवाय श्रुतीने बॉलिवूड चित्रपट 'पगलैट'मध्ये काम केले आहे.

टॅग्स :संजय लीला भन्साळी