Join us  

'हीरामंडी' फेम अभिनेत्याची हॉलिवूड स्टार टॉम क्रुझशी झाली भेट, फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:46 AM

'हीरामंडी' सीरिजमध्ये त्याने ताजदार ही भूमिका साकारली. त्याच्या चार्मिंग लूक्सवर तरुणी फिदा झाल्या.

संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' मधून तरुणींचा क्रश बनलेला अभिनेता ताहा शाह (Taha Shah) सध्या चर्चेत आहे. ताहा हॉलिवूड स्टार टॉम क्रूझचा मोठा चाहता आहे. त्याची आपल्या आवडत्या स्टारला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली आहे.   नुकतंच त्याने टॉम क्रूझसोबतचा फोटो शेअर केला आहे. हे स्वप्नच सत्यात उतरलं असल्याची भावना ताहाने व्यक्त केली आहे. टॉम क्रूझला (Tom Cruise) भेटून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

अभिनेता ताहा शाहने 'हीरामंडी' सीरिजमध्ये ताजदार ही भूमिका साकारली. त्याच्या चार्मिंग लूक्सवर तरुणी फिदा झाल्या. ताहा शाह सध्या लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिथेच त्याची भेट टॉम क्रूझसोबत झाली. ताहाच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्वकाही सांगून जात आहे. टॉम क्रुइझही ताहाच्या खांद्यावर हात ठेवून हसताना दिसतोय. 'कोणीतरी मला चिमटा काढा, आताच माझ्या आदर्श व्यक्तीला भेटलो. एकमेव टॉम क्रुझ." असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

ताहाच्या या पोस्टवर चाहत्याने लिहिले,'तुझी स्माईल सगळं काही सांगत आहे','सुपर भाई'. एका मजेतच लिहिले,'हा व्हिडिओ पाहून वाटतंय की टॉम क्रुझच ताहाचा फॅन आहे'. काही सेलिब्रिटींनीही ताहाच्या पोस्टवर हॉर्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. 

माध्यम रिपोर्टनुसार, टॉम क्रुझ लवकरच 'मिशन इम्पॉसिबल 8' मध्ये दिसणार आहे. त्याने नुकतंच लंडनमध्ये 'ट्विस्टर्स' या सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती.  इथेच दोघांची भेट झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीहॉलिवूडसोशल मीडियावेबसीरिजसंजय लीला भन्साळी