Join us

'...तर मी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडेन'; नुकतंच पक्षप्रवेश केलेल्या शेखर सुमन यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 6:05 PM

शेखर सुमन यांनी अलीकडेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. परंतु आता त्यांनी एक मोठं विधान केलंय. ज्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत (shekhar suman)

काहीच दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीतील भाजपाच्या पक्षाच्या मुख्यालयात शेखर सुमन आणि राधिका खेडा यांना भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व देण्यात आले. शेखर सुमन हे अनेक वर्षांनंंतर 'हिरामंडी' या वेबसिरीजमधून अभिनय करताना दिसत आहेत. अशातच एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी भारतीय जनता पार्टीबद्दल मोठं विधान केलंय. 

शेखर म्हणाले, “मी अजूनही एक अभिनेताच आहे जो राजकारणाचा फक्त भाग आहे. जेणेकरुन मला माझ्या उद्योगासाठी आणि राज्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्याचं मला सामर्थ्य मिळेल. मला कोणत्याही राजकीय गडबडीत आणि वादात पडायचे नाहीय. याशिवाय माझी कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मी राजकारणी नाही. परंतु राजकारणात राहून मला ज्या प्रकारची कामं करायची इच्छा आहे, तेच करायचे आहे."

शेखर पुढे म्हणाले, "काही कामं करण्यासाठी मी स्वतःला एक अंतिम वेळ दिला आहे. जर या वेळात मी निश्चित कामं पूर्ण केली नाहीत तर मी पक्षातून बाहेर पडेन. मी राजकारणात एका खास कारणासाठी आलो आहे. मला लोकांची सेवा करायची आहे. मला सेवा करता येत नसेल, तर केवळ निमित्तमात्र म्हणून इथे थांबण्यात मला काही अर्थ वाटत नाही." असं मत शेखर सुमन यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :शेखर सुमनबॉलिवूडभाजपा