Join us

संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी' वेब सीरिजचा डोळे दिपवणारा भव्य सेट कसा तयार झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:42 AM

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' या वेब सीरिजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' या वेब सीरिजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'हीरामंडी'मध्येही प्रेक्षकांना शाही थाट, आकर्षक मांडणी, नाट्यमय भव्यदिव्य सेट पाहायला मिळणार आहे. 'हिरामंडी' सीरिजचीच्या कथेइतकीच सध्या सेट्सचीही चर्चा सुरू आहे.  'हिरामंडी' सीरिजसाठी संजय लीला भन्साळी यांनी अतिशय भव्य सेट हा तीन एकरांवर उभारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये हा भव्य सेट उभारण्यासाठी 700 कारागिरांच्या टीमने सात महिने काम केलं आहे.

नुकतेच संजय लीला भन्साळी यांनी  'आर्किटेक्चरल डायजेस्ट'शी बोलताना भव्यदिव्य जागेत हरवून जायला आवडतं, म्हणून मोठ्या सेटची आवड असल्याचं सांगितले. ते म्हणाले, 'वेब सिरीजचा सेट बनवण्यासाठी 700 कारागीर कामाला लागले होते. मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये सुमारे 60 हजार लाकडी फळ्या आणि धातूच्या फ्रेम्सवर सेट तयार करण्यासाठी सात महिने काम केले करण्यात आलं'.  

'हिरामंडी'चा सेट उभारण्यासाठी खूप मोठी मेहनत घेण्यात आली आहे.  ख्वाबगाह, एक भव्य पांढरी मशीद, एक विशाल अंगण, डान्सिंग हॉल, पाण्याचे कारंजे, रस्ते, दुकाने, लहान खोल्या आणि एक हमाम खोली (स्नानगृह), या सर्व गोष्टी सेटवर उभारण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर भिंती आणि खिडक्यांच्या चौकटींवर चांदीचे काम, फरशीवर मीनाकारी नक्षीकाम आणि झुंबर हे सर्व भन्साळींच्या देखरेखीखाली हाताने बनवण्यात आले आहेत.

हिरामंडीच्या निमित्ताने संजय लिला भन्साळी पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करत आहेत. हिरामंडी ही त्यांची पहिली वेबसीरिज असून या सीरिजच्या माध्यमातून स्वातंत्र्यापूर्वी वेश्यावस्तीतील जीवन कसं होतं, तेथील स्त्रियांची कहाणी या सीरिजमधून मांडण्यात येणार आहे. हिरामंडी हा उर्दू शब्द आहे. म्हणजे हिरा बाजार. 'हीरामंडी' या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, शर्मिन सहगल आणि संजीदा शेख हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :संजय लीला भन्साळीनेटफ्लिक्स