Join us

वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या पावलावर पाऊल ठेवतं सोनाक्षीचाही राजकारणात प्रवेश? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:47 IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा हे देखील राजकारणात आहेत.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच एका बॉलीवूडच्या बोल्ड व हॉट अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्रीने स्वतः एक मोठं विधान केलं आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा हे देखील राजकारणात आहेत. अशा परिस्थितीत सोनाक्षी राजकारणात एन्ट्री घेण्याचा विचार करतेय का ? यावर सोनाक्षीनं भाष्य केले.  YouTuber राज शामानी यांच्याशी बोलताना ती म्हणाली, 'मी राजकारणात येणार नाही, नाहीतर लोक म्हणतील की तिथेही घराणेशाही सुरू आहे.  मग तिथेही तुम्ही नेपोटिझम असं म्हणालं. 

ती म्हणाली, "मला वाटत नाही की माझ्याकडे राजकारणासाठी योग्यता आहे. माझे वडील खूप लोकाभिमुख व्यक्ती आहेत. मी खूप खाजगी व्यक्ती आहे. राजकारणी व्हायचं असेल तर तुम्हाला लोकांमध्ये राहावं लागतं.  त्यांच्यासाठी तिथे हजर असावं लागतं.  मी माझ्या वडिलांना असे करताना पाहिले आहे".

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतेच तिची 'हीरामंडी: द डायमंड बाजार' ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. दुहेरी भूमिकेत दिसलेल्या सोनाक्षी सिन्हा हिने भन्साळींच्या बहुप्रतिक्षित सीरिजमध्ये रेहाना आणि फरीदानच्या भूमिका साकारल्या आहेत. सीरिजमधील सोनाक्षीचा अभिनय प्रेक्षकांना भावला आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाशत्रुघ्न सिन्हाराजकारणसेलिब्रिटीबॉलिवूड