Join us

Dharmendra -Hema Malini : हेमा मालिनी यांनी आजपर्यंत सासरी एकदाही पाऊल ठेवलं नाही, काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 9:39 AM

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत

अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) 'ड्रीम गर्ल' म्हणून प्रसिद्ध आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांची लव्हस्टोरी तर सगळ्यांनाच माहित असेल. त्याकाळी सर्वात गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी हे एक होतं. 1980 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला तब्बल ४३ वर्ष झाली. मात्र तुम्हाला माहितीए  की हेमा मालिनी लग्नानंतर एकदाही सासरी पाऊलही ठेवलं नाही. 

काय आहे कारण?

धर्मेंद्र बॉलिवूडमधील मोस्ट चार्मिंग अभिनेते म्हणून ओळखले जात होते.  हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा धर्मेंद्र यांचं आधीच लग्न झालं होतं. ते आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायलाही तयार नव्हते. पहिल्या पत्नीला न सोडताच त्यांना हेमामालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न करायचं होतं.धर्मेंद्र यांचं 1957 अगदी लहान वयात लग्न झालं होतं. प्रकाश कौर या त्यांच्या पहिल्या पत्नी. त्यांना मुलंही झाली होती. अखेर त्यांनी धर्म बदलण्याचा निर्णय घेतला आणि 1980 मध्ये हेमामालिनी यांच्याशी दिसरे लग्न केले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न झालं तरी त्या कधीच सासरी गेल्या नाहीत. त्या नेहमी वेगळ्याच राहिल्या. त्यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून वेगळं राहायचं हे दोघांनी ठरवलं होतं.धर्मेंद्र यांनी लग्नापूर्वी ही अटच घातली होती आणि हेमाजींनी ती कायम पाळली. हेमाजींनी त्यांना कधीच पहिल्या कुटुंबापासून वेगळं केलं नाही. तर धर्मेंद्र यांनीही दोन्ही कुटुंबाची जबाबदारी लीलया पेलली.

दोन्ही घरांमध्ये आहे १० मिनिटांचे अंतर

हेमा मालिनी मुंबईत ज्या घरात राहतात ते घर धर्मेंद्र यांच्या घरापासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र तरी हेमामालिनी आणि सासरचं घर यातील दरी मोठी आहे. हेमामालिनी यांचं सासू-सासऱ्यांसोबत चांगलं नातं होतं. एकदा त्यांचे सासू सासरे हेमाजींना भेटायला घरी आल्याचं त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे. 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न झालं तेव्हा सर्वांनी हेमाजींना हाऊसब्रेकर म्हटले होते. मात्र वास्तविक पाहता धर्मेंद्र यांनी दोन्ही कुटुंबावर समान प्रेम केलं. धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून बॉबी (Bobby Deol) आणि सनी (Sunny Deol) ही दोन मुलं आहेत. तर हेमा मालिनी यांना ईशा आणि आहाना या दोन मुली आहेत. मुलांमध्ये मात्र एकमेकांशी अजिबातच संवाद नसल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्रदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट