Hera Pheri 3: गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) ची जोरदार चर्चा सुरू आहे. अक्षय कुमारने (Akshay Kumar) स्वत: या चित्रपटाचा भाग नसल्याची पुष्टी केल्यानंतर चाहत्यांची निराशा झाली आहे. Bring Back Raju, No Raju No Hera Pheri सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अक्षयने चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत निर्मात्यांशी सहमत नसल्याचे सांगितले होते. पण, आता चाहत्यांची मागणी लक्षात घेऊन निर्मात्यांनी अक्षयला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
राजूला परत आणण्यासाठी प्रयत्न जर सर्व काही ठीक झाले तर अक्षय चित्रपटात पुनरागमन करू शकतो. 'हेरा फेरी' फ्रँचायझीमध्ये राजूच्या भूमिकेसाठी निर्माता फिरोज नाडियाडवाला अक्षय कुमारशी चर्चा करत असल्याचे पिंकविलाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सूत्राने सांगितले की, 'हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यनला कास्ट करण्याची चर्चा होती, आता अक्षयची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या 10 दिवसांत फिरोजने अनेकवेळा अक्षय कुमारला भेटून मतभेद मिटवल्याची माहिती आहे. त्यामुळे अक्षय हेरा फेरी 3मध्ये दिसू शकतो.
रिपोर्ट्सनुसार, हेरा फेरी अक्षय कुमारशिवाय बनू शकत नाही. तीनही प्रमुख कलाकारांसोबत ही फ्रेंचायझी परत आणण्यासाठी बोलणी सुरू आहे. अक्षयनेही फिरोज नाडियादवाला यांच्यासोबत चित्रपट अधिक मनोरंजक बनवण्यात रस दाखवला आहे. आता तो आणि फिरोज बसून 'हेरा फेरी 3'चा निर्णय घेतील. जर सर्व काही ठीक झाले तर अक्षय राजूच्या भूमिकेत परत येऊ शकतो. अक्षयसोबत चित्रपटात सुनील शेट्टी आणि परेश रावल दिसतील. ज्याप्रकारे चाहते राजूला परत आणण्याची मागणी करत आहेत, त्यावरून निर्माते आणि अक्षय काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.