Join us

शाह बानो केसवर येणार सिनेमा, 'ही' बॉलिवूड अभिनेत्री साकारणार भूमिका; उत्सुकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:09 IST

शाह बानोची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार माहितीये का?

बॉलिवूडमध्ये अनेकदा खऱ्या गोष्टींवर आधारित सिनेमे आले आहेत. नुकताच 'द साबरमती रिपोर्ट'ही आला ज्यामध्ये साबरमती एक्सप्रेसचं सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याआधी आर्टिकल ३७० देखील आला होता. आर्टिकल ३७० हटवण्यासाठी प्रशासनात कशाप्रकारच्या हालचाली झाल्या होत्या हे समोर आलं. तर आता शाह बानोच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येण्याच्या तयारित आहे. शाह बानोने मुस्लिम पर्सनल लॉ मधील एका क्लॉजला आव्हान दिलं होतं. शाह बानोची (Shah Bano) भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार माहितीये का?

६२ वर्षीय शाह बानोने तिच्या पतीने ट्रिपल तलाक दिल्यावर त्याच्याकडून पोटगी घेण्यासाठी सात वर्ष कायदेशीर लढाई लढली होती. कलम १२५ अंतर्गत तिची केस दाखल करुन घेण्यात आली होती. ज्यामध्ये तिने मुस्लिम पर्सनल लॉमध्ये असलेल्या 'इद्दत'ला  आव्हान दिलं होतं. एप्रिल १९८५ साली सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये महिलांचे अधिकार, धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक कायद्याच्या व्याख्येवरुन देशात विवाद सुरु झाला होता. 

यामी गौतमच्या या सिनेमाची निर्मिती जंगली पिक्चर्स, विशाल गुरनानी आणि जूही पारेख मेहता करणार आहेत. 'द फॅमिली मॅन 2'चे दिग्दर्शक सुपर्ण वर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. दिग्दर्शकाचं नाव समजल्यावर तर सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. 

टॅग्स :यामी गौतमबॉलिवूडतिहेरी तलाकमुस्लीमसिनेमा