या दशकांतील हिंदी चित्रपटांचा खजिना रसिकांसाठी ठरतो प्रेरणादायी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 12:07 PM
हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील १९५० आणि १९६० या दशकांच्या कालखंडाला आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे. देशाला दोनशे वर्षांच्या परकीय ...
हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील १९५० आणि १९६० या दशकांच्या कालखंडाला आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे. देशाला दोनशे वर्षांच्या परकीय राजवटीच्या जोखडातून मुक्तता मिळाल्यामुळे १९५०च्या दशकातील चित्रपटांना एक वैशिष्ट्यपूर्ण असा आवाज आहे.चैतन्य अधिकाधिक उंची गाठत होते आणि क्रांतीची चव त्या काळातील हवेतच होती.चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील काही मैलाचे दगड निर्माण करणारा हा वैभवशाली कालखंड होता.या काळातील महत्त्वपूर्ण चित्रपटांनी पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयख्याती मिळवली.हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ज्यांची नावे कायमस्वरुपी कोरली गेली आहेत,अशा काही दिग्गजांनी तयार केलेल्या अद्वितीय कलाकृतींचा खजिना म्हणजे ही दोन दशके.मग तो उत्कट गाण्यांनी हिरॉइन्सना आळवणारा जादूगार देव आनंद असो किंवा आपल्या अतिसुंदर हास्याने हिरोंना संवाद विसरायला लावण्याची किमया साधणारी (कारण हिच्या दैवी सौंदर्यावरून नजर हटवणे त्यांना शक्यच होत नसे) मधुबाला असो किंवा ज्याच्या चित्रपटांतील छायादिग्दर्शनाने आपल्याला वेगळ्या नजरेने चित्रपट बघणे शिकवले तो सदारोमॅण्टिक गुरूदत्त असो... या आणि यासारख्या अनेक कारणांमुळे हिंदी चित्रपटांचा १९५० व १९६० या दोन दशकांचा कालखंड आपल्याला अनंतापर्यंत प्रेरणा देत राहील.म्हणूनच या काळातील चित्रपटांना आपण म्हणतो सदाबहार.या कालखंडातील महान प्रतिभेचा गौरव सोनी मॅक्स२ टाइमलेस डिजिटल पुरस्कार सीझन-३ मार्फत करत असतानाच (https://max2awards.sonyliv.com/), केवळ भारतीयच नाही, तर जागतिक व्यासपीठावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ‘पहिल्यां’ना जन्म देणाऱ्या काही मौल्यवान चित्रपटांच्या योगदानाची दखल घेणे समर्पक ठरेल. सादर आहे आपल्याला भारतीय चित्रपटसृष्टीच्या वारसाबद्दल प्रचंड अभिमान वाटेल अशा १० चित्रपटांची यादी...१. पहिला त्रैभाषिक चित्रपट ‘मुघल-ए-आझम’ बॉलिवूडचे हे महाकाव्य खरोखरीच तीन भाषांत चित्रित करण्यात आले होते: इंग्रजी, तमीळ आणि हिंदी.मात्र, तमीळ आवृत्ती अपयशी ठरल्याने इंग्रजी आवृत्तीही काढून टाकण्यात आली आणि केवळ हिंदी आवृत्ती प्रदर्शित झाली!२. संगम– परदेशात चित्रीकरण झालेला पहिला चित्रपट राज कपूर, राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या प्रेमत्रिकोणाची कथा सांगणाऱ्या संगम चित्रपटाची बरीच दृश्ये युरोपमध्ये चित्रित करण्यात आली होती. त्या काळात केवळ चलचित्रामध्ये (मोशन पिक्चर) दाखवलेला परदेश बघण्यासाठी चाहत्यांनी या चित्रपटाला तुफान गर्दी केली होती.३.मदर इंडिया- भारताचे पहिले ऑस्कर नामांकन नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार यांच्या भूमिका असलेला सामाजिक महाचित्रपट मदर इंडिया हा भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी परदेशी चित्रपटांच्या विभागासाठी पाठवण्यात आलेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट केवळ भारताने ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवला नाही, तर तो परदेशी चित्रपटांच्या विभागात पहिल्या पाचात नामांकितही झाला. चित्रपटाच्या कथानकामुळे ऑस्कर ज्युरीजना यातील प्रमुख व्यक्तिरेखा आपलीशी वाटली.४. भारतातील पहिला सिनेमास्कोप चित्रपट: कागझ के फूल भारतातील पहिला सिनेमास्कोप चित्रपट कागझ के फूल म्हणजे काळाच्या खूप पुढे असलेली एक अद्वितीय कलाकृती होती. हा चित्रपट गुरूदत्त यांचा सर्वोत्तम चित्रपट समजला जातो. मात्र, दु:खद बाब म्हणजे तिकीटबारीवर हा चित्रपट साफ कोसळला आणि त्यानंतर गुरूदत्त यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही.कागझ के फूल या चित्रपटाची कथा गुरूदत्त यांच्या आयुष्यावरच, त्यांच्या वहिदा रहमान व गीतादत्त यांच्यासोबतच्या नात्यांवर बेतलेली होती, असेही म्हटले जाते.५. यादें (१९६४) - हिंदी चित्रपटातील पहिले स्वगत प्रेरणा ही अशी बाब आहे, जी अनपेक्षित क्षणांना चमकून अपवादात्मक अशी निर्मिती घडवते; ही कलाकृती कदाचित काळाच्या खूप पुढची असते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, सुनील दत्त यांच्या सर्जनशील कारकिर्दीतील सर्वांत कल्पक चित्रपट यादें. सर्वांत कमी व्यक्तिरेखा असलेला कथात्मक चित्रपट म्हणून यादें या चित्रपटाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले. दु:खद बाब म्हणजे प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा रुचला नाही.६. टाइम्सच्या सार्वकालिक १०० चित्रपटांच्या यादीत तसेच साइट अॅण्ड साउंडच्या २५० महान चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव चित्रपट- प्यासा गुरू दत्त, वहिदा रहमान, माला सिन्हा यांच्या भूमिका असलेला प्यासा कठोर, कोरड्या समाजातील एका अयशस्वी कवीच्या आयुष्याची कथा सांगतो. अलीकडेच, एका भारतीय कंपनीने व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शनासाठी पुनरुज्जीवित केलेला प्यासा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.७. हंसते आंसू- ‘ए’ प्रमाणपत्र मिळालेला पहिला भारतीय चित्रपट भारतीय सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये (१९१८) सुधारणा करून डिसेंबर १९४९ मध्ये ‘केवळ प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र हंसते आंसू या चित्रपटाला देण्यात आले. असे प्रमाणपत्र दिले गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट. या चित्रपटामध्ये मधुबाला आणि मोतीलाल यांच्या भूमिका होत्या.८. श्री ४२०: सोव्हिएट रशियामध्ये सर्वांत लोकप्रिय ठरलेला पहिला परदेशी चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या या राज कपूर, नर्गिस आणि नादिरा यांच्या भूमिका असलेल्या श्री ४२० या चित्रपटाने सोव्हिएट रशियामधील तिकीट बारीवर ३५ दशलक्ष प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि हा तेथील सर्वांत यशस्वी परदेशी चित्रपट ठरला.९.दो आँखे बारा हाथ: गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त करणारा पहिला भारतीय चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला दो आँखे बारा हाथ हा चित्रपटही काळाच्या खूप पुढे होता.सॅम्युअल गोल्डवीन विभागात प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला.१०.आवारा: “आवारा हूँ” हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवणारे पहिले भारतीय गाणे शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेल्या “आवारा हूँ” या गाण्याने जगभरातील विविध वर्गांतील,विविध पार्श्वभूमींतून आलेल्या श्रोत्यांना आपल्या तालावर डोलायला लावले. हे बॉलिवूडमधील सार्वकालिक दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम गाणे आहे,असा कौल मे २०१३ मध्ये बीबीसीने घेतलेल्या पोलमध्ये दिसून आला.