पाकिस्तानची जनता पाकिस्तान जिंदाबाद... पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावते. पण पाकिस्तानी नागरिक म्हणून आपण बाहेर जातो आणि बाहेर ज्याप्रकारे आपली चेकिंग होते, ते मी इथे सांगूच शकत नाही. एक एक कपडा उतरवला जातो, त्याक्षणी मला स्वत:ला प्रचंड अपमानित वाटते, असे सांगत सबाने तिच्यासोबत घडलेली आपबीती कथन केली. मला आठवते मी शूटींगसाठी त्बिलिसी(जॉर्जियाची राजधानी) येथे गेले होते. त्बिलिसीच्या एअरपोर्टवर आम्ही उतरलो. यादरम्यान माझ्यासोबत असलेली सगळी इंडियन टीम बाहेर पडली. पण मला एअरपोर्टवरच रोखून धरण्यात आले. माझ्या पासपोर्टने मला रोखून धरले. मी पाकिस्तानी होते, म्हणून मला रोखले गेले. मग चौकशी झाली, मुलाखत झाली आणि मग अनेक तासानंतर माझी सुटका झाली. त्यादिवशी पाकिस्तानींचा बाहेर काय मान आहे, काय स्थान आहे, आपण कुठे आहोत, हे मला कळून चुकले, असे सबा म्हणाली आणि हे सांगताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दहशतवादामुळे जगात पाकिस्तानची छबी खराब झाली आहे. पाकिस्तानी लोक बाहेर जातात तेव्हा त्यांना सर्रास संशयाच्या नजरेने बघितले जाते, असेही ती म्हणाली. सबाचा हा व्हिडिओ सबा आलम नामक अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.ALSO READ : सलमान खानची खिल्ली उडविणाऱ्या पाकी अभिनेत्री सबा कमरला झाली उपरती तुम्हाला सांगू इच्छितो की, ‘हिंदी मीडियम’ याच चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटसाठी सबा व अभिनेता इरफान खान त्बिलिसी येथे गेले होते.It's not just #SabaQamar who feels humiliated. All #Pakistanis feel humiliated when we are considered a terrorist state, when our children are killed like flies & we can't get justice for them, when terrorist like #HafizSaeed roam around freely & we watch them helplessly. pic.twitter.com/pHalKqo7cq— Sabah Alam (@AlamSabah) January 16, 2018
‘हिंदी मीडियम’ची अभिनेत्री सबा कमरने रडत रडत मांडली पाकिस्तानी असण्याची व्यथा! पाहा व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 5:43 AM
‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिला एक टीव्ह शोदरम्यान स्वत:चे अश्रू आवरता आले ...
‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिला एक टीव्ह शोदरम्यान स्वत:चे अश्रू आवरता आले नाहीत. जगापुढे लाजीरवाणे व्हावे लागलेल्या सबाचा बोलता बोलताच बांध फुटला. सबाच्या मनात ठसठसणारी जखम इतकी खोल होती की, तिने रडत रडत आपबीती सांगितली. केवळ इतकेच नाही तर पाकिस्तान या नावामुळे जगभरात कसे लाजीरवाणे व्हावे लागते, यावरही ती परखडपणे, कुणाचीही भीड - मुर्वत न राखता बोलली.