बॉलिवूडमध्ये प्रोस्थेटिक मेकअप ठरतायेत हिट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 6:06 PM
बेनझीर जमादारप्रत्येक चित्रपटात कलाकाराचा लूक हा खूप महत्त्वाचा असतो. यासाठी मेकअपला अधिक महत्त्व दिले जाते. बॉलिवूडमध्ये चित्रपटातील भूमिका ...
बेनझीर जमादारप्रत्येक चित्रपटात कलाकाराचा लूक हा खूप महत्त्वाचा असतो. यासाठी मेकअपला अधिक महत्त्व दिले जाते. बॉलिवूडमध्ये चित्रपटातील भूमिका जिंवत राहावी, यासाठी रूपेरी पडद्यावर प्रोस्थेटिक तंत्र वापरून मेकअप केला जातो. आता हेच पाहा ना, रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा आगामी चित्रपट ‘२.०’चे नुकतेच दिमाखदार पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरची चर्चादेखील रंगू लागली आहे. या पोस्टरमध्ये अक्षय आणि रंजनीकांत यांचा प्रोस्थेटिक तंत्र वापरून मेकअप करण्यात आला आहे. असाच डोळे दिपविणारा मेकअप बॉलिवूडच्या कोणत्या चित्रपटांमध्ये करण्यात आला आहे, याचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला आढावा... क्रिश : प्रत्येक दिग्दर्शकाला वाटते, की कथेप्रमाणे आपल्या चित्रपटातील अभिनेत्याचा लूकदेखील हटके पाहिजे. कारण काही वेळा लूकमुळेदेखील चित्रपट भाव खाऊन जातात. असाच क्रिश चित्रपटातील डोळ्यांना मास्क लावलेला अभिनेता ह्रतिक रोशनचा लूक हा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. कारण प्रोस्थेटिक तंत्र वापरून केलेला ह्रतिकच्या या चित्रपटातील असाच लूक धूम २ या चित्रपटादेखील करण्यात आला होता. यानंतर ह्रतिकचा मास्क लावलेला हा लूक प्रेक्षकांना खूप भावला. द डिझायर : २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या द डिझायर या चित्रपटात शिल्पा शेट्टीच्या मेकअपचीदेखील बरीच चर्चा रंगली होती. या चित्रपटात शिल्पाचे पूर्णपणे कृत्रिम पद्धतीने टक्कल करण्यात आले होते. तिच्या या प्रोस्थेटिक मेकअपला चित्रीकरणावेळी साधारण चार तासांचा अवधी लागत होता. या मेकअपमध्ये शिल्पाला कोणाशीही बोलण्याची परवानगी दिली नव्हती. त्याचबरोबर, तिला खाण्यासाठी आणि पिण्यासाठीदेखील सक्त मनाई करण्यात आली होती; पण या मेकअपमुळे शिल्पाच्या भूमिकेमध्ये जिवंतपणा आला होता. त्यामुळे तिच्या या लूकचेदेखील विशेष कौतुक करण्यात आले होते. सरबजीत : या चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या मेकअपची चर्चा खूप रंगली होती. ऐश्वर्याने या चित्रपटात सरबजीतच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ऐश्वर्याचा मेकअप हा प्रोस्थेटिक तंत्र वापरून करण्यात आला होता. त्यामुळे ही अभिनेत्री तिच्या वयापेक्षाही जास्त वयाची पाहायला मिळाली होती. मात्र, या चित्रपटावेळी तिचा मेकअप करणारे मेकअपमन सुभाष शिंदे यांचीदेखील खूप चर्चा झाली होती. तसेच, त्यांच्या या कलेचेदेखील सोशल मीडियावर भरभरून कौतुक करण्यात आले. रावण : या चित्रपटात बॉलिवूडच्या किंग खानची हटके भूमिका पाहायला मिळाली. त्याच्या या भूमिकेचा अंदाज हा लूकवरूनदेखील लक्षात येतो. त्याचा जो लूक होता, त्यामध्य्ोदेखील प्रोस्थेटिक तंत्र वापरून केलेला मेकअप होता. जेणेकरून प्रेक्षकांना चित्रपटाच्या वेळी वास्तवता पाहायला मिळेल. शाहरुखच्या या लूकमुळे चित्रपटात खरंच जिवंतपणा पाहायला मिळाला. शाहरूखच्या प्रोस्थेटिक तंत्र वापरून केलेल्या मेकअपमुळे चित्रपटालादेखील चार चाँद लागले होते. तसेच, त्याच्या या लूकची चर्चादेखील बरीच रंगली होती. चाची ४२० : या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. तसेच, दशावतारम् या चित्रपटातील कमल हसन यांच्या दशावतारांची चर्चा आजही प्रेक्षक करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांतील लूकची जादू प्रोस्थेटिक तंत्रामुळेच शक्य झाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक लूकमधून एक वास्तवता प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आजही त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच, प्रत्येक कलाकारासाठी आपली भूूमिका ही प्रेक्षकांच्या लक्षात राहणे महत्त्वाचे असते. यासाठी प्रोस्थेटिक तंत्र वापरून केलेले मेकअप हे कलाकाराला त्यांच्या भूमिकेला साज चढविण्यासाठी अधिक मदत करतात.