Join us

Holi Songs: बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 4:29 AM

होळी आणि बॉलिवूड यांचे एक वेगळे कनेक्शन आहे. होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूडची गाणी नसतील, असे शक्यच नाही.

होळी आणि बॉलिवूड यांचे एक वेगळे कनेक्शन आहे. होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूडची गाणी नसतील, असे शक्यच नाही. गेली अनेक वर्षं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत. अशीच काही होळीची खास गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होळी सेलिब्रेट करताना या गाण्यावर तुम्ही देखील नक्कीच ताल धरा...बलम पिचकारीबलम पिचकारी हे गाणे ये जवानी है दिवानी या चित्रपटातील असून हे गाणे शाल्मली खोब्रागडेने गायले आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीरवर चित्रीत झालेले हे गाणे तरुणांमध्ये चांगलेच फेमस आहे.होली खेले बागबान या चित्रपटातील होली खेले रघुवीरा हे गाणे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. या गाण्यात हेमा मालिनी आणि अमिताभ यांची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते.रंग बरसेअमिताभ बच्चन यांनी गायलेले रंग बसरे हे गाणे रसिकांचे प्रचंड आवडते गाणे आहे. अमिताभ बच्चन यांच्या सिलसिला या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरीही ते गाणे तितकेच ताजे आहे. होली के दिन... शोले या चित्रपटातील होली के दिन... हे गाणे म्हणजे, रंगांमध्ये न्हाऊन निघालेल्या प्रेमींच्या मनातील नेमक्या भावना. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्यात धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी त्यांच्या नृत्याने चार चाँद लावले होते.अरे जा रे हट नटखट...ग्रेट क्लासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गाण्याशिवाय होळी सेलिब्रेशन करणे हे अशक्यच आहे. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित नवरंग या सिनेमातील महिपाल आणि संध्या यांनी जिवंत केलेले हे गाणे म्हणजे एक अल्टीमेट होली साँग. अंग से अंग लगानाडर या चित्रपटातील अंग से अंग लगाना या गाण्यावर जुही चावला, अनुपम खेर यांनी तुफान डान्स केला आहे. हे गाणे होळीच्या पार्टीला आवर्जून लावले जाते. आज ना छोडेंगेकट्टी पतंग या चित्रपटातील आज ना छोडेंगे हे गाणे राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावर चित्रीत केले आहे. या गाण्यात राजेश खन्ना यांचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळतो.