कपूर कुटुंब आरके स्टुडिओजमध्ये ग्रॅण्ड होळी सेलिब्रेशन केले जाते आणि दरवर्षी या ठिकाणच्या होळीचं सर्वांना आकर्षण असते. राज कपूर स्वतः शानदार पार्टीचे आयोजन करत होते. आणि प्रत्येक गोष्टींवर त्यांचे लक्ष असायचे. होळीचा रंग बॉलिवूड सेलिब्रेटींवर सामान्य व्यक्तीसारखा चढायचा.
होळीच्या निमित्ताने सर्वच सेलिब्रेटींच्या घरी जंगी सेलिब्रेशन असतं. मात्र सर्वात जास्त लोकप्रिय आहे कपूर, बच्चन, अख्तर-आझमी कुटुंबाची होळी. चित्रपट कलाकारांच्या होळींचा स्वतःचा इतिहास आहे. बॉलिवूडमध्ये राज कपूर यांची होळी भलेही आज इतिहास असेल पण ऐतिहासिक राहिली आहे. एक वेळ होता जेव्हा बॉलिवूडमध्ये होळीचा अर्थ राज कपूर यांच्या आरके स्टुडिओच्या होळीचा होता. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर सुरूवातीच्या दिवसात त्यांच्या थिएटरच्या लोकांसोबत होळी सेलिब्रेट करत होते. या होळीला लोकप्रिय राज कपूर यांनी केले होते.
१९५२ साली आर के स्टुडिओमध्ये दमदार होळी साजरी केली जात होती. एका मोठ्या टँकमध्ये रंग आणि दुसऱ्या टँकमध्ये भांग बनवली जायची. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला त्या दोन्ही गोष्टींची मजा लुटावी लागत होती. राज कपूर स्वतः शानदार पार्टीचे आयोजन करत होते. आणि प्रत्येक गोष्टींवर त्यांचे लक्ष असायचे. या होळी सेलिब्रेशनला कलाकारांची जंगी उपस्थिती असायची.बच्चन कुटुंबातही दरवर्षी होळीचे सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात केले जाते. २००४ सालची बच्चन यांची होळी पार्टी खूप चर्चेत राहिली होती. यामागचं कारण आहे शाहरूख खान आणि अमर सिंग यांचे पॅचअप. एका पुरस्कार सोहळ्यात बाचाबाची झाल्यामुळे त्या दोघांच्या नात्यात कटुता आली होती.
शाहरूख खानने कित्येक वेळा मन्नतमध्ये होळी पार्टीचे आयोजन केले आहे. निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांची होळी पार्टी एका वेगळ्या अंदाजाची आठवण करून देते. ते होळीच्या निमित्ताने सर्व सिनेइंडस्ट्रीला मढ आयलंडवरील बंगल्यावर सर्वांना गोळा करतात. हळूहळू या शानदार होळी पार्टीचा ट्रेंड नामाशेष होत चालला आहे. मात्र शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी आजही त्यांच्या ४० वर्षांचा जुना रितीरिवाज कायम ठेवला आहे.
शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी दरवर्षी त्यांच्या घरी होळी पार्टीचे आयोजन करत होते.
त्याचप्रमाणे त्यादेखील दरवर्षी होळीचा सण त्याच उत्साहाना साजरा करत असतात.