Join us

Honey Singh Girlfriend: घटस्फोटानंतर हनी सिंग पडला पुन्हा प्रेमात, त्याची लेडी लव्ह त्याला मारते या नावानं हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:26 IST

हनी व टीना पब्लिकली पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालंय.

Honey Singh Girlfriend Tina Thadani: हनी सिंह(Honey Singh)ने अलीकडेच त्याची नवी गर्लफ्रेंड टीना थडानी (Tina Thadani) ची ओळख जगाला करून दिली आहे. पत्नी शालिनीपासून घटस्फोटानंतर टीना थडानीने हनीला या वाईट काळातून बाहेर काढले. अलीकडेच हनी सिंह दिल्लीत एका इव्हेंटमध्ये दिसला, ते सुद्धा गर्लफ्रेन्डच्या हातात हात घालून. हनी व टीना पब्लिकली पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालंय. या इव्हेंटमध्ये हनी सिंहने आपल्या प्रेमाची कबुली देताना टीना थडानीचे कौतुकही केले. या कार्यक्रमात हनी सिंगने सर्वप्रथम टीनाची ओळख त्याची गर्लफ्रेंड म्हणून करून दिली. 

हनी सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हनी सिंह असे म्हणताना दिसत आहे की - "माझी गर्लफ्रेंड टीना इथं बसली आहे, हिने मला हे नाव दिले आहे. हि मला म्हणाली, तू माझा हनी 3.0 आहेस." घटस्फोटानंतर काही महिन्यांतच हनी सिंग आपल्या गर्लफ्रेंडसोबत मूव्ह ऑन झाल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले. 

आपल्या अल्बमबद्दल बोलताना हनी सिंहने सांगितले की, या अल्बममध्ये प्रत्येकाला भरपूर रोमान्स आणि डान्स पाहायला मिळणार आहे. हनी सिंहने या अल्बमचे श्रेय त्याच्या गर्लफ्रेंडला दिलं आहे. टीनाने आपले आयुष्यात आनंद कसा भरला हे हनीने सांगितले. टीना थडानीची कौतुक करताना हनी म्हणाला,"ती खूप चांगली व्यक्ती आहे, तिने माझा भूतकाळसोबत माझा स्विकार केला. ती अजूनही माझ्या आयुष्यात आहे याचा मला खूप आनंद आहे. 

सप्टेंबर 2022 मध्ये हनीने पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला. दोघांचा 20 वर्षांचा संसार यामुळे संपुष्टात आला.  शालिनीने 20 कोटींची पोटगी मागितली होती. पण घटस्फोटावेळी हनीने तिला फक्त 1 कोटी दिले. घटस्फोटानंतर शालिनीने हनीवर गंभीर आरोप केले होते. हनीने आपल्याला मारहाण केली. शारिरीक व मानसिक छळ केला. त्याने माझा विश्वासघात केला. शिवाय आर्थिक फसवणूकही केली, असं तिने म्हटलं होतं. हनीने अर्थातच हे सर्व आरोप धुडकावून लावले होते.

टॅग्स :हनी सिंह