Join us

पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर हनी सिंह या सुंदरीला करतोय डेट, तिच्या बोल्डनेसपुढे मलायका-नोराही फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 18:35 IST

Honey Singh: प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंह त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे सध्या खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हनी सिंह सध्या प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानी हिला डेट करत आहे. मात्र आतापर्यंत त्याने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

मुंबई - प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंह त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे सध्या खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हनी सिंह सध्या प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानी हिला डेट करत आहे. मात्र आतापर्यंत त्याने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र फॅन्स आणि नेटिझन्स हे हनी सिंह आणि टीना थडानी हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे दावे करत आहेत. सोशल मीडियावर हनी सिंह याचा एक फोटो व्हायरल होत होता. त्यानंतर या दोघांच्याही अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या फोटोमधील तरुणीचा चेहरा दिसत नव्हता. मात्र हनी सिंहने त्या तरुणीचा हात पकडून ठेवला होता.

हनी सिंहने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना एक कॅप्शन लिहिली होती. ती पाहीन लोकांना वाटले की हनी सिंह हा तिच्या नव्या रोमँटिक पार्टनरकडे इशारा करत आहे. त्याने दोन हातांचा एक क्लोजअप फोटो शेअर करताना लिहिले की, हे सर्व आमच्यााबाबत आहे. मी अँड यू. माझं गाँ टुगेदर फॉरएव्हर आता आऊट झालं आहे. हनी सिंहच्या पोस्टवर आता फॅन्सकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

मात्र हनी सिंहने त्याच्यासोबत असलेल्या त्या महिलेच्या नावाचा उलगडा केलेला नाही. मात्र ती महिला दुसरी तिसरी कुणी नसून मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानी आहे, असा फॅन्सचा दावा आहे. टीनाने फोटोमध्ये जे ब्रेसलेट घातले आहे. ते झूम करून पाहिले असता हनी सिंहसोबतच्या फोटोमध्ये असलेल्या मुलीनेही तसेच ब्रेसलेट घातलेले दिसत आहे. हनी सिंह याने शालिनी तलवार हिच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र नंतर ते दोघेही वेगले झाले. त्यांचा घटस्फोट झाला आहे.  

टॅग्स :हनी सिंहबॉलिवूड