बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंगच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्याची पत्नीने त्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने 'द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस अॅक्ट' अंतर्गत एक याचिका न्यायालयात दाखल केली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तिने तक्रार केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती तानिया सिंह यांच्या समक्ष ही याचिका सादर केली आहे. 'आज तक'च्या रिपोर्टनुसार वकील संदीप कपूर, अपूर्वा पांडे आणि जी.जी. कश्यप यांनी शालिनी तलवारच्या वतीने ही याचिका न्यायमूर्तींसमोर मांडली. त्यानंतर न्यायालयाकडून हनी सिंगविरोधात एक नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये त्याने २८ ऑगस्टपूर्वी या नोटिसवर उत्तर देणे बंधनकारक असेल असे म्हटले आहे. तसेच, दोघांची मिळून असणारी संपत्ती विकायची नाही आणि स्त्रीधनाशी कोणताही खेळ न करण्याची सूचना त्याला करण्यात आली आहे.