हॉरर सिनेमे म्हटले की आजही हॉलिवूड सिनेमांची नावं येतात. पण बॉलिवूडमध्येही असे मोजके सिनेमे आहेत जे पाहून काळजाचा थरकाप उडतो. दिग्दर्शक विक्रम भट यांच्या प्रॉडक्शन हाऊसने असे खास सिनेमे बनवले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. २०१३ साली आलेला असाच एक सिनेमा पाहून प्रेक्षकांची आजही घाबरगुंडी उरते. हा सिनेमा आयुष रैना दिग्दर्शित 'हॉरर स्टोरी'.
काय आहे हॉरर स्टोरी सिनेमाची कहाणी?
या सिनेमाची कहाणी म्हणजे सात मित्र आणि एका रिकाम्या हॉटेलच्या भोवती ही कहाणी फिरते. हे हॉटेल आधी मेंटल हॉस्पिटल म्हणून ओळखलं होतं. मस्ती-मजाकमध्ये हे सात मित्र त्या हॉटेलमध्ये शिरतात. परंतु सात मित्रांपैकी किती जण सुखरुप वाचतात, उर्वरीत मित्रांचं काय होतं, याची कहाणी 'हॉरर स्टोरी'मध्ये बघायला मिळते. या सिनेमात अशा अनेक घटना घडतात ज्या पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतकी चमक दाखवू शकला नसला तरीही सर्व कलाकारांनी चांगलं काम केल्याने ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय त्यांच्या लक्षात राहिलाय.
हॉरर स्टोरीमधील कलाकार
विक्रम भट यांनी या सिनेमाची कथा लिहिली होती. तर आयुष रैनाने सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांनी या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करण कुंद्रा, निशांत मलकानी यांचा हा पहिला सिनेमा होता. याशिवाय राधिका मेनन, हसन जैदी, अपर्णा वाजपेयी, रवीश देसाई आणि नंदिनी वैद या कलाकारांनी सिनेमा प्रमुख भूमिका साकारली होती. कहाणी आणि धडकी भरवणारे प्रसंग अशा गोष्टींमुळे सिनेमाची चांगलीच चर्चा झाली.