Join us

लोकांची लूट सुरु आहे! दिल्लीत 300 ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवणारी रवीना टंडन रूग्णालयांवर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 1:56 PM

 कोरोनाची दुसरी लाट भयंकर जीवघेणी ठरतेय. अशात मदतीचे हात पुढे येत आहेत. आता अभिनेत्री रवीना टंडन हिनेही गरजूंपर्यंत ऑक्सिजनपासून मेडिकल किट पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे.

ठळक मुद्दे रवीनाने अलीकडे दिल्लीत ऑक्सिजन सिलेंडरने भरलेला ट्रक पाठवला होता.

 कोरोनाची दुसरी लाट भयंकर जीवघेणी ठरतेय. अशात समाजातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सोनू सूद, प्रियंका चोप्रा, ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार, फरहान अख्तर, गुरमीत चौधरी यांच्यानंतर आता अभिनेत्री रवीना टंडन ( Raveena Tandon) हिनेही गरजूंपर्यंत ऑक्सिजनपासून मेडिकल किट पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे.रवीना टंडन सामान्य लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मदत मागणारे रोज शेकडो मॅसेज येत आहेत. रवीना या सर्व मॅसेजला जातीने उत्तर देत आहेत. अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने रवीनाने एक टीम बनवली आहे.

तिने याबद्दल सांगितले, परिस्थिती भीषण आहे. हा विनाश आहे. देशभरातून मदतीसाठी लोक याचना करत आहेत. आम्ही ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कंसट्रेटर्स, मेडिकल किट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत. रवीनाने अलीकडे दिल्लीत ऑक्सिजन सिलेंडरने भरलेला ट्रक पाठवला होता.

रूग्णालयांवर संतापली...लोकांच्या मदतीसाठी सरसावलेली रवीना लोकांना लुटणा-या रूग्णालयांवर प्रचंड भडकली. अनेक रूग्णालयांनी लोकांची लुटमार चालवली आहे. महागडी औषधे व इंजेक्शनच्या नावावर लोकांना लुटले जातेय. सामान्य, गरिब लोकांची दुर्दशा न बघवत नाहीये, अशा शब्दांत तिने आपला संताप बोलून दाखवला़. 

टॅग्स :रवीना टंडन