Samantha Ex Husband Naga Chaitanya Dating Rumors: साऊथचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य त्याचा पुढचा चित्रपट 'कस्टडी'च्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. नागा आजकाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्याने 2017 मध्ये सामंथा रुथ प्रभूशी लग्न केले, परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता अशी अफवा पसरली आहे की नागा सध्या अभिनेत्री आणि मॉडेल शोभिता धुलिपालाला (Sobhita Dhulipala) डेट करत आहे. मात्र, शोभिताने अखेर या वृत्तांवर मौन सोडले आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा एका फॅन्सी रेस्टॉरंटमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, शोभिता म्हणाली की मीडिया एखाद्या गोष्टीवरून ठिपके जोडत आहे. तिच्या वैयक्तिक किंवा लव्ह लाइफबद्दल अंदाज लावत आहे, हे मला आवडत नाही. कारण ही माझी अतिशय वैयक्तिक बाब आहे. नागा चैतन्यबाबत शोभिताने तिच्या कथित नात्याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, 'मी सध्या फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. मला चांगले चित्रपट करायचे आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयीच्या अफवांची मला पर्वा नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यामुळे माझ्यासाठी काळजी करण्यासारखे काही नाही.
नागा चैतन्य सोबत रिलेशनशिपमध्ये आहे की नाही असे शोभिताला थेट विचारण्यात आले, त्यावेळी शोभिता म्हणाली, 'ही माझी वैयक्तिक बाब आहे. मी आणि माझ्या आयुष्यात काय घडत आहे हे मला स्पष्ट करण्याची गरज नाही. ते सार्वजनिक डोमेनमध्ये आणण्याची मला काहीच गरज वाटत नाही. मला माझ्या आयुष्याबद्दल बोलण्याची किंवा स्पष्ट करण्याची गरज नाही."