Join us

Hotness overloaded! चर्चेत शिबानी दांडेकरचा बिकनी फोटो, फरहान अख्तरला मिळतंय फोटोचं क्रेडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 16:21 IST

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिबानी आणि फरहान गेल्या एका वर्षांपासून जास्त एकमेकांना डेट करत आहेत.

फरहान अख्तरशिबानी दांडेकर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिबानी आणि फरहान गेल्या एका वर्षांपासून जास्त एकमेकांना डेट करत आहेत. नुकतीच शिबानी बिकनी फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या चर्चेला उधाण आले ते फरहान अख्तरमुळे. कारण शिबानीचा हा बिकनीतील हा फोटो फरहान अख्तरने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

शिबानी दांडेकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिचा बिकनी फोटो अभिनेत्री पूजा हेगडे, रिया चक्रवर्ती व मिनिषा लांबाने लाईक केला आहे. या फोटोत शिबानीने प्रिटेंड बिकनी परिधान केली आहे. या फोटोला बऱ्याच लोकांनी कमेंट केली आहे आणि तिच्या फिटनेसचे कौतूक केले आहे.

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. फरहानने तर कित्येक वेळा शिबानीसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करून जाहीर केले आहे.

अलीकडे फरहानने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत शिबानी व फरहान दोघांच्याही बोटांत एकाच स्टाईलची अंगठी दिसली होती. या फोटोवरून दोघांनीही साखरपुडा केल्याचे बोलले जात होते. 

फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुले आहेत.

गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती.

खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता.

पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेच जाहिर केले होते. 

टॅग्स :शिबानी दांडेकरफरहान अख्तर