'हाऊसफुल ४' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, पूजा हेगडे व क्रिती खरबंदा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे लंडन व राजस्थानमधील दोन शेड्युलचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे मुंबईतील चित्रीकरणदेखील पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या सेटसाठी जवळपास वीस कोटी रुपये खर्च केले आहेत.
प्रोडक्शन्सच्या सू्त्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते साजिद नाडियादवाला 'हाऊसफुल ४' बनवताना कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. या चित्रपटासाठी बनवण्यात आलेले मुंबईतील चित्रकुट मैदानावरील व वृंदावन स्टुडिओमधील सेटसाठी जवळपास वीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटात बाहुबली काळ दाखवण्यासाठी व्हिएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. या सिनेमात राजाचा दरबार पाहायला मिळणार आहेत. तसेच ३६ फुटांचा खांब व मार्बल फ्लोअरिंग पाहायला मिळणार आहेत. खांब हिऱ्यांनी सजवण्यात आले असल्याचे सूत्रांक़डून समजते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिदने सेट डिझाइन करणाऱ्यांना स्पष्ट काय हवे हे सांगितले होते. इतकेच नाही तर चित्रपटाच्या सेटचा फोटो लिक होऊ नये, यासाठी सेटवर कोणालाही फोन आणण्यास मनाई होती.'हाउसफुल- ३’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.