Join us

नाना पाटेकर, अक्षय कुमार, श्रेयस, रितेश अन् बरेच कलाकार! Housefull 5 च्या सेटवरील पहिला फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:30 IST

हाऊसफुल्ल 5 च्या सेटवरील पहिला फोटो व्हायरल. एका फ्रेममध्ये अनेक कलाकार

Housefull 5 या बॉलिवूड सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. काही महिन्यांपूर्वीच Housefull या लोकप्रिय फ्रँचायझीच्या पुढील सिनेमाची घोषणा झाली. आता Housefull 5 च्या शूटिंगला सुरुवात झाली. या सिनेमामध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज असणार आहे. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. Housefull 5 च्या सेटवरील सर्व कलाकारांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोत कोण कोण कलाकार सहभागी आहेत, हे बघून तुम्हालाही  सुखद धक्का बसेल.

Housefull 5 मध्ये दिसणार अनेक कलाकार

साजिद नाडियादवाला निर्मित Housefull 5 मध्ये दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. Housefull 5 शूटिंगच्या सेटवरील एक फोटो व्हायरल झालाय. या फोटोत दिसून येतं की, Housefull 5 मधील सर्व कलाकार एका फोटोत एकत्र आले आहेत. यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, डिनो मोरिया या लोकप्रिय कलाकारांची फौज आहे.

Housefull 5 कधी रिलीज होणार?

बहुचर्चित आणि मल्टिस्टारर Housefull 5 हा सिनेमा ६ जून २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने वेलकमनंतर अक्षय कुमार आणि नाना पाटेकर अनेक वर्षांनी एकत्र येणार आहेत. याशिवाय बऱ्याच कालावधीनंतर नाना पाटेकर एका कॉमेडी सिनेमात दिसणार आहेत. अशाप्रकारे Housefull 5 ची उत्सुकता शिगेला आहे. २०२५ मधील मल्टिस्टारर आणि बिग बजेट सिनेमा म्हणून Housefull 5 कडे बघितलं जातंय.

 

टॅग्स :नाना पाटेकरअक्षय कुमारडिनो मोरियाफरदीन खानअभिषेक बच्चनश्रेयस तळपदेरितेश देशमुख