Join us  

कसा बनला शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड? गेल्या २९ वर्षांपासून सावली प्रमाणे भाईजानचे करतोय रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 3:58 PM

Salman Khan Bodygaurd Shera : कित्येक वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून कार्यरत आहे. एका मुलाखतीत शेराने म्हटले होते की, मी ज्या प्रमाणे सलमान खानला मॅनेज करतो आहे तसे कोणीच करू शकत नाही.

सलमान खान(Salman Khan)चा बॉडीगार्ड शेरा(Shera)ला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तो नेहमी सावलीप्रमाणे सलमानच्या रक्षणासाठी सज्ज असतो. गेल्या तीन दशकापासून शेरा सलमानचा बॉडीगार्ड म्हणून कार्यरत आहे. १९९५ साली सलमानच्या सुरक्षा टीममध्ये सहभागी झाल्यानंतर मागील २९ वर्षापासून त्याची रक्षा करतो आहे. सलमान देखील शेराला खूप सन्मान देतो.

एका मुलाखतीतत शेराने सलमान खानसोबतच्या बॉण्डबद्दल सांगितले. तो म्हणाला की, त्यांच्या भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमीने त्यांच्या मजबूत नातेसंबंधात कधीही अडथळा आणला नाही. शेराने असेही अभिमानाने सांगितले की, त्याची जशी काळजी आणि संरक्षण करतो तसे दुसरे कोणी करू शकत नाही.

शेराने सलमान खानसाठी काम कसे सुरू केले?शेराने झूमला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, या कामासाठी सलमान खानचा भाऊ सोहेल खानने त्याची शिफारस केली होती. शेरा म्हणाला, मी पहिल्यांदा त्याला एका शोमध्ये भेटलो आणि सोहेल भाईने मला कॉल केला. माझ्या भावासाठी सुरक्षा आवश्यक आहे, तेव्हा स्टेज शोमध्ये काही समस्या निर्माण झाली होती. तेव्हा सोहेल भाईने माझ्याकडे पाहिलं की तू असं का करत नाहीस. सोहेलने विचारले, 'तू सलमान भाईसोबत का जात नाहीस?' मी हो म्हणालो. मग मी सलमान भाईसोबत शोमध्ये जायला लागलो आणि हळूहळू माझे त्याच्यासोबत नातं निर्माण झालं.

'सलमानला माझ्यासारखे कोणीही सांभाळू शकत नाही'शेरा पुढे म्हणाला, आमचे बाँडिंग खूप मजबूत होते, ते मजबूत आहे. मी सरदार आहे, तो पठाण आहे, तर बोलतात ना जोडी जमते. तेव्हा मी माझ्या भाईजानला सांगितले, जोपर्यंत मी तिथे आहे तोपर्यंत मी तुझ्यासोबत राहून तुझी सेवा करीन. मुलाखतीदरम्यान शेरा म्हणाला की, बॉडीगार्ड अनेकदा बदलले जात असले तरी सलमान खानला त्याच्यासारखे कोणीही सांभाळू शकत नाही, असा त्याला विश्वास आहे.

सलमान खानपूर्वी शेरा अनेक सेलिब्रिटींचा राहिलाय बॉडीगार्ड शेराचे खरे नाव गुरमीत सिंग जॉली आहे. तो टायगर सिक्युरिटी या सुरक्षा फर्मशी संबंधित आहे. सलमान खानचा अंगरक्षक बनण्यापूर्वी शेराने गायक व्हिगफिल्ड आणि डायना किंग तसेच मायकल जॅक्सनसारख्या प्रमुख व्यक्तींना सुरक्षा पुरवली आहे.