अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंह राजपूतच्या परिवारावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. सुशांतचे वडील के के सिंह यांनी रियावर पैसे हडपल्याचा आरोप केलाय. के के सिंह यांनी बिहारमध्ये रिया विरोधात गुन्हा नोंदवला होता. बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी आले होते. आता रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत यावर उत्तर दिलं आहे.
सुशांतच्या परिवाराने आरोप लावले होते की, रियाने १५ कोटी रूपये सुशांत सिंह राजपूतकडून घेतले. याबाबत सुशांतच्या वडिलांनी तक्रारही दिली होती. २०१९ मध्ये सुशांतच्या अकाऊंटमध्ये १७ कोटी रूपये होते. काही महिन्यात १५ कोटी रूपये ट्रान्सफर झाले. याची चौकशी करण्याची मागणी त्याच्या परिवाराने केली होती.
'कुठे आहेत १७ कोटी'?
यावर रियाने सांगितले की, 'हेच तर मी विचारत आहे की, ते १७ कोटी रूपये कुठे आहेत. जे माझ्या अकाऊंटमध्ये दिसायला पाहिजे. माझी मुंबई पोलिसांनी चौकशी केली, माझी ईडीने चौकशी केली. पुढे जाऊन सीबीआयही चौकशी करणार. आणि आता ऐकायला मिळालं की, एनसीबीही चौकशी करणार आहे. मी सर्व चौकशींमध्ये सहकार्य करणार आहे'.
'त्यांना कसं माहीत १७ कोटी रूपये आहेत'
'तुम्ही का नाही सांगत की, १५ कोटी रूपये कुठे आहेत, कारण ते माझ्या अकाऊंटमध्ये नाहीत. आता जेव्हा सुशांतचे बॅंक स्टेटमेंट पब्लिक झाले की, त्याच्या अकाऊंटमध्येही नव्हते. आणि जर सुशांतचे वडील सुशांतला कधी भेटलेच नाही तर त्यांना कसे माहीत की, सुशांतच्या अकाऊंटमध्ये १७ कोटी रूपये आले होते की, गेले होते'.
महेश भट्टसोबतच्या चॅटींगवर स्पष्टीकरण
रियाने मुलाखतीत महेश भट्ट यांच्यासोबतच्या चॅटीगबाबतही खुलासा केलाय. असे सांगितले गेले होते की, रियाने भांडणानंतर ८ जूनला सुशांतचं घर सोडलं होतं आणि त्यानंतर तिचं महेश भट्ट यांच्यासोबत बोलणं झालं होतं. रियाने सांगितले की, 'मी परेशान होते आणि दु:खी होते. कारण सुशांतने मला परत बोलवलं नाही. त्याने कॉल बॅक केला नाही. आमच्यात इतकंच होतं का? की मी आजारी होते म्हणून त्याला माझ्यापासून दूर रहायचे होते?'.
महेश भट्टसोबत झालेल्या संवादाबाबत ती म्हणाली की, त्यांच्यासोबत झालेल्या संवादाचा सुशांत आणि त्यांच्या नात्याचं काहीही देणं घेणं नाही.
रियाने याआधी सांगितल्या प्रमाणे तिला डिप्रेशनची समस्या होती आणि त्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर फार प्रभाव पडला होता. ८ जूनला तिचं आणि सुशांतचं भांडण झालं होतं. ज्यानंतर ती आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेली होती. त्याच दिवशी रियाने महेश भट्ट यांनी मेसेज केला होता की, 'सर आएशा जड मनाने आणि शांततेत पुढे निघाली आहे. तुमच्यासोबत शेवटी झालेल्या बोलण्याने माझे डोळे उघडले होते. तुम्ही तेव्हाही आणि आताही माझ्यासाठी देवदूतासारखे आहात'.
रियाने महेश भट्ट यांना केलेल्या मेसेजवर रिप्लाय आला होता की, 'आता मागे वळून बघू नकोस. आता जे गरजेचं आहे ते कर. तुझ्या वडिलांना माझं प्रेम दे आणि ते आता आनंदी होतील'.
हे पण वाचा :
रियाला कशी मिळाली होती सुशांतच्या मृत्यूची बातमी? डेड बॉडी पाहून का म्हणाली होती, सॉरी बाबू?
रिया म्हणाली - 'माझी बस एकच चूक झाली', पहिल्यांदाच मीडियासमोर मांडली तिने तिची बाजू!