कठोर परिश्रम करण्यापासून स्वतःला कधीच थांबवायला नको. तुम्ही अभियंते असा, डॉक्टर असा, बिझिनेस मॅन असा किंवा कोणत्याही प्रोफेशनशी निगडित असा, कायम आशीर्वाद घेत राहा. कारण, जेव्हा धावणाऱ्या वाहनाला आशीर्वादाची चाके लागतात तेव्हा प्रवास कमालीचा होतो आणि लक्ष्यप्राप्ती लवकर हाते. प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता सोनू सूदने हाँगकाँगमध्ये आयोजित 'लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समिट अँड अवॉईस २०२५'मध्ये हे वक्तव्य केले. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री अहाना कुमराने त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या.
हाँगकाँगमध्ये आयोजित 'लोकमत ग्लोबल कन्वेंशन समिट अँड अवॉर्डस २०२५'मध्ये भविष्याची दिशा: आर्टिफिशियल इंटेलिजेंस, वैश्विक व्यापार आणि अर्थव्यवस्था' या विषयावर चर्चा करताना अभिनेता सोनू सूद, पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, राजाराम बाबू शुगर फॅक्टरीचे चेअरमन प्रतीक जयंत पाटील, काऊंसिलर आणि सायको थेरेपिस्ट तृप्ती शिंदे, स्मिता हॉलीडेजचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर जयंत गोरे आणि मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र, जि. जळगावचे आमदार चंद्रकांत निबाजी पाटील आणि अभिनेत्री अहाना कुमरा.
तुमचे मित्र आणि सहकलावंत जॅकी चैन हे सुद्धा हाँगकाँगचे आहेत, त्यांच्यासोबतच्या आठवणी कशा आहेत?
- त्यांच्यासोबतच्या आठवणी अत्यंत मजेदार आहेत. त्यांचे चित्रपट बघतानाच मी मोठा झालो आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मजेदार होता. ते सतत कार्यमग्न आणि सरळ स्वभावाचे व्यक्ती आहेत, जैकी चैन जेव्हाही सेटवर पोहोचतात तेव्हा ते सोबत फळे आणतात आणि सेटवर काम करणाऱ्यांना वाटून देतात. अनेकदा तुम्हाला वाटते की तुम्ही अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती आहात. तुमचे जग वेगळे आहे. परंतु, एका कलाकाराला लोकांशी नेहमी जुळून राहणे अत्यंत गरजेचे असते. माझा प्रवास नागपुरातून 'लोकमत'मधूनच झाला आहे. लोकमत परिवाराचे जे लोक भाग आहेत, त्यांच्याशी मी खूप आधीपासूनच जुळलेलो आहे. 'लोकमत भवन' नागपुरातील आयकॉनिक इमारत आहे. आमचे निकाल बघण्यासाठी आम्ही तेथे जात होतो. नागपुरातून इंजिनिअरिंग केली आणि मुंबईत आली. दहा-बारा भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले, मला असे वाटते, जेव्हा तुमच्याकडून कुणाच्या तरी अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांवर तुम्ही खरे ठरता तेव्हा त्यापेक्षा मोठा अवॉर्ड कुठलाच असू शकत नाही.
तुम्ही नागपूरसंदर्भात कशाला मिस करता?
- मी नागपूरच्या प्रत्येक गोष्टींना मिस करतो. मी नागपुरातील धरमपेठमध्ये राहत होतो. शंकरनगरच्या टपरीवर चहा असो वा नागपूरचे प्रसिद्ध पोहे असो, साऱ्यांना मी मिस करतो. इंजिनिअरिंगचे जेवढे विद्यार्थी होते ते सगळे सकाळसकाळी शंकरनगरमध्ये चहा व पोहे खाण्यासाठी येत असत. तेथे असे वातावरण तयार होत असे की भरपूर अभ्यास करणार आहोत. ही बाब वेगळी की अभ्यास किती केला जात होता. परंतु, चहा-पोह्यांचे सत्र नियमित चालत होते. नागपुरातच माझी सासूरवाडी आहे. त्यामुळे स्वाभाविकच नागपूरशी माझे संबंध आजही कायम आहेत.
कोरोना संक्रमण काळात मानवतेसाठी काम करण्याची सुरुवात कशी झाली?
- कोरोना संक्रमण काळात मी गरजूंसाठी काम करू शकलो, यासाठी मी भगवंताचे कायमच आभार मानत असतो. मला स्वतःलाच माहीत नाही की मी हे कसे करत गेलो. मुंबईच्या जवळील ठाणे येथून जेव्हा शेकडोंच्या संख्येने मजूर परिवार आपल्या राज्यांकडे परतत होते, तेव्हा अशाच एका कुटुंबाशी माझी भेट झाली. ते कुटुंब बंगळुरूला जात होते. त्यांच्या कुशीत एक बाळ होते आणि एक मुलगा सोबत चालत होता. ते पायदळच आपल्या गावाकडे जात असल्याचे त्यांच्याकडून कळले. त्यांनी माझ्याकडे दहा दिवसांसाठी काही फळ आणि खाण्याच्या वस्तू मागितल्या. मी त्यांना एवढ्या दूर पायदळ कसे जाऊ शकणार, असे विचारत त्यांच्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करत सर्व प्रशासकीय परवानगी घेऊन पहिल्या वेळेस दहा बसद्वारे साडेतीनशे लोकांना त्यांच्या गंतव्यस्थळाकडे रवाना केले.
महाराष्ट्रातील अवॉर्डींबाबत काय बोलाल?
तुमव्यासोबत भेटून खूप आनंद झाला. तसे तर मी पंजाबमधून येतो. परंतु, महाराष्ट्राशी माझे नाते शब्दांनी व्यक्त करू शकत नाही. माझ्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग मी महाराष्ट्रात घालवला आहे. आपण सगळे आशीर्वाद मिळवत राहा. कारण, जेव्हा धावणाऱ्या वाहनाला आशीर्वादाची चाके लागतात तेव्हा प्रवास कमालीचा होतो आणि लक्ष्यप्राप्ती लवकर होते.
'फतेह'चा प्रबास कसा राहिला?
माझी आई मला नेहमीच पत्र लिहीत होती. ती म्हणायची, की तू नेहमी लिहीत राहा. लिहिण्याचे कौशल्य मला माझ्या आईकडून मिळाले आहे. 'दबंग', 'सिंग इज किंग'सारख्या चित्रपटांसाठी मी डायलॉग लिहिले आहे. मात्र, क्रेडिट कधीच घेतले नाही. मला नेहमीच वाटायचे की मी स्वतः काहीतरी असे लिहावे, जे वेगळे असेल. तेव्हा मी 'फतेह' लिहायला सुरुवात केली. आतापर्यंत भारतीय चित्रपटांमध्ये जे अॅक्शन दिसले नाही, तसे अॅक्शन या चित्रपटात घेतले आहेत. मी स्वतःला जसे दाखवू इच्छित होतो, तसाच दाखवण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शनही मी स्वतःच केले.
साऊथचे चित्रपट असे काय करत आहेत, ने बॉलिवूडमध्ये नाही?
मला साऊथच्या कलाकारांमध्ये कायमच पेशन्स दिसतो. ज्या दिवशी शुटिंग सुरू होत होती, त्याच दिवशी चित्रपट कधी प्रदर्शित होणार, हे निश्चित होऊन जाते. एक काळ असाही होता जेव्हा साऊथचे लोक बॉलिवूडसारखे चित्रपट बनवू इच्छित होते. आता बॉलिवूड साऊथसारखे सिनेमे बनवायला लागला आहे.