रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत त्याने त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि वडील तसेच त्याची आई आणि आलिया (Alia Bhatt) यांच्यातील नातेसंबंधांबद्दल सांगितले आहे. रणबीर कपूरबद्दल याआधी अनेक बातम्या समोर आल्या होत्या, ज्यात त्याने सांगितले होते की तो वडिलांसमोर डोळे वर करून बोलू शकत नाही. आता लोक त्याला चीटर म्हणत असल्याचा खुलासाही त्याने केला आहे. आता त्याने त्याची आई आणि आलिया यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
रणबीर कपूरने सांगितले आहे की, आलिया भट आणि नीतू कपूर या दोन सासू-सूनेमध्ये कसले नाते आहे. निखिल कामथच्या पॉडकास्टमध्ये, बॉलिवूड रॉकस्टारने सांगितले की आलिया तिच्या कुटुंबावर किती प्रेम करते आणि तिचे तिच्या सासू-सासऱ्यांसोबत चांगले संबंध आहेत. आपले मत व्यक्त करताना अभिनेता म्हणाला, 'माझी आई आणि आलिया दोघेही एकमेकांना खूप चांगले समजतात. दोघांमध्ये खरे नाते आहे. ती माझ्या आईसोबत ज्या प्रकारे राहते ते पाहून मला खूप आनंद होतो. मी माझी आई, माझ्या बहिणी, आलिया आणि आता राहा अशा महिलांसोबत राहिलो आहे. ती संपूर्ण जगातील सर्वोत्तम स्त्री आहे.
असे आहे सासू-सुनेचं नातं
जिथे जिथे आलिया भट सासू नीतू कपूरसोबत दिसली तिथे दोघांमध्ये एक वेगळीच बॉन्डिंग पाहायला मिळते. सोशल मीडियावरही दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात. अनेकदा दोघेही एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. आलिया आणि नीतू कपूर यांच्यातील हे खास बॉन्डिंग पाहून लोकांच्या मनात हा प्रश्न अनेकदा येतो की खऱ्या आयुष्यातही त्यांच्यामध्ये एवढं खास बॉन्डिंग आहे का? हे फक्त कॅमेरासाठी नाही का? रणबीरच्या या मुलाखतीनंतर सासू-सून यांच्यातील नात्याचे सत्यही बाहेर आले आहे.
तेव्हाही आलिया रणबीरच्या होती खंबीरपणे पाठिशी उभी
ऋषी कपूर आजारी असतानाही आलियाने कपूर कुटुंबाला खूप साथ दिली, असा खुलासाही रणबीरने केला. आलिया त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहायची. ऋषी कपूर यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असतानाही ती रणबीरच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.