Join us

अशाप्रकारे जितेंद्र जोशीला मिळाली होती Sacred Games मधील काटेकरची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 5:44 PM

सेक्रेड गेम्स 2 ही वेबसिरिज जितेंद्र जोशीला कशी मिळाली याची कथा अतिशय रंजक आहे.

ठळक मुद्देमी ऑडिशन देण्यासाठी तयार झालो. मी त्यानंतर काहीच दिवसांत काटेकर या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आणि त्यात माझी निवड देखील झाली. पण चित्रीकरणासाठी मला सलग तीन महिने द्यावे लागणार होते आणि मी त्यावेळी मी एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.

सेक्रेड गेम्सच्या यशानंतर या वेबसिरिजचे चाहते सेक्रेड गेम्स २ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 15 ऑगस्टला सेक्रेड गेम्स २ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गणेश गायतोंडे, सरजात सिंग, काटेकर या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनल्या असून या वेबसिरिजमध्ये काटेकरची भूमिका जितेंद्र जोशीने साकारली होती. ही वेबसिरिज जितेंद्र जोशीला कशी मिळाली याची कथा अतिशय रंजक आहे. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र जोशीने या वेबसिरिजमधील त्याच्या निवडीचा किस्सा सांगितला. त्याने सांगितले की, मी माझ्या मंदार गोसावी या मित्रासोबत गप्पा मारत रस्त्यावर उभा होतो. आम्ही खूप वेळ तिथेच गप्पा मारत असल्याने अखेरीस आम्ही त्याच्या घरी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही मस्त जेवलो. गप्पा मारल्या. या गप्पा मारत असतानाच मंदारने सांगितले की तो नेटफ्लिक्सवरील एका वेबसिरिजसाठी कास्टिंग करतोय. 

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यावेळी हे नेटफ्लिक्स म्हणजे काय हेच मला माहीत नव्हतं. त्यावर त्याने मला सांगितले की, ‘सेक्रेड गेम्स’या कादंबरीवर आधारित अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने हे एका वेबसिरिजची निर्मिती करत आहेत. त्या दोघांची नावे ऐकताच मी ऑडिशनला जायचा विचार केला. पण त्याआधी रोलबद्दल त्याला विचारले तर त्याने मला सांगितले की, एका हवालदाराच्या भूमिकेसाठी सध्या ऑडिशन सुरू आहे. तू ते ऑडिशन दे... त्यावर मी लगेचच म्हटलं की, नको रे. कारण मराठी कलाकारांना नेहमीच अशाच दुय्यम प्रकारच्या भूमिका दिल्या जातात. मराठीतली काही मोजकी नावे सोडली तर कोणालाच हिंदीत चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. 

माझे हे बोलणे ऐकल्यावर मंदारने मला समजावले की, ही भूमिका खूपच चांगल्या आहे आणि त्याचमुळे मी ऑडिशन देण्यासाठी तयार झालो. मी त्यानंतर काहीच दिवसांत काटेकर या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आणि त्यात माझी निवड देखील झाली. पण चित्रीकरणासाठी मला सलग तीन महिने द्यावे लागणार होते आणि मी त्यावेळी मी एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. मी निखिल महाजनचा चित्रपट करत होतो. त्यामुळे मी त्याला याची कल्पना दिली तर त्याने माझ्यासाठी त्या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आणि एवढेच नव्हे तर त्याने मला नेटफ्लिक्सविषयी सांगितले आणि नेटफ्लिक्सला माझे अकाऊंट देखील ओपन करून दिले. 

टॅग्स :जितेंद्र जोशीसॅक्रेड गेम्स