Akshay Kumar - Amitabh Bachchan - सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि खिलाडी कुमार अक्षय हे दोघेही लोकप्रिय अभिनेते आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे हे दोन्ही स्टार जाहिराती करण्यासाठी कोटींमध्ये मानधन घेतात. पण, हे झालं खाजगी जाहिराताबद्दल. पण, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आपण अनेक सरकारी जाहिरातींमध्ये पाहिलं आहे. या सरकारी जाहिरातांसाठी ते किती मानधन आकारातात, हे आपण जाणून घेऊया.
आपण टीव्हीवर विविध जाहिरात पाहतो, या जाहिरातींंमध्ये खूप मोठे स्टार असतात. जेवढा मोठा स्टार तेवढी जास्त त्याचं मानधन हे गणीत ठरलेलं असतं. पण हे जाणून तुम्हालाही कौतुक वाटले की, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे दोन सेलिब्रिटी आहेत, जे सरकारी जाहिरातींसाठी पैसे घेत नाहीत. ते जाहिरात विनामूल्य करतात. अमिताभ बच्चन यांची पोलिओ आणि अक्षय कुमारची धुम्रपान विरोधी जाहिरात ही त्याचीच उदाहरणे आहेत. ही माहिती प्रसिद्ध ॲड फिल्म मेकर प्रभाकर शुक्ला यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितली.
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'भूत बंगला' सिनेमा ख्रिसमस २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने १४ वर्षांनी प्रियदर्शन-अक्षय एकत्र येत आहेत. तर अमिताभ बच्चन हे Kalki 2898 AD सिनेमात दिसले होते. यामध्ये अमिताभ अश्वत्थामाच्या भूमिकेत होते. या सिनेमाचा दुसरा भागदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.