Join us

किती आहे ‘तान्हाजी’चा बजेट? ब्लॉकबस्टर होण्यासाठी कमवावे लागतील इतके कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:49 AM

अजय देवगणच्या ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय.

ठळक मुद्देभारतात हा सिनेमा 3880 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. गत 10 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. पाच दिवसांत या चित्रपटाने 90 कोटींचा गल्ला जमवला, यावरून याचा अंदाज यावा. हा चित्रपट अजयचा 100 वा चित्रपट आहे. अजयने यात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. पण आज आम्ही मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणा-या या चित्रपटाच्या बजेटबद्दल सांगणार आहोत.

कुठलाही ऐतिहासिक सिनेमा असो, त्याचे बजेट मोठे असते. भव्यदिव्य सेट, कलाकारांचे त्याकाळाशी सुसंगत पोशाख, युद्धाचे प्रसंग आणि पडद्यावर ते जिवंत करण्यासाठी लागणारे तंत्र असे सगळे साकारताना चित्रपटाचा बजेट वाढतो.  ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’बद्दल सांगायचे झाल्यास, या चित्रपटाचा बजेट 135 कोटी इतका आहे. यामध्ये 15 कोटी रुपये प्रॉडक्शन आणि प्रमोशनमध्ये खर्च झाले आहेत. याप्रकारे या चित्रपटाचा एकूण बजेट 150 कोटींचाआहे.

साहजिकच चित्रपटाच्या बजेटनुसार या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरण्यासाठी किमान 150 कोटींच्या वर कमाई करावी लागेल.  चित्रपटाला सुपरहिट चित्रपटाच्या यादीत यायचे असेल तर 200 कोटींची कमाई करावी लागेल. ‘तान्हाजी’ 230 कोटींच्या वर कमाई करण्यास यशस्वी झाला तर तो ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये समाविष्ठ होईल. तूर्तास तरी या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून हा चित्रपट नक्कीच 230 कोटींचा पल्ला गाठेल, असे वाटतेय.

 भारतात हा सिनेमा 3880 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले आहे. उत्कृष्ठ कथा आणि जबरदस्त अ‍ॅक्शन भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे आणि हेच कारण आहे की हा चित्रपट भारताशिवाय इतर देशांमध्ये चांगली कमाई करत आहे.