Join us

आलिया खूश्श! बर्थ डेला रणबीर कपूरने असे दिले सरप्राईज 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 11:24 AM

काल करण जोहरच्या घरी आलियाच्या बर्थ डेची झक्कास पार्टी रंगली. म्हणायला, या पार्टीत आलियाचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर हजर नव्हता. पण या सरप्राईज पार्टीचा प्लान मात्र फक्त आणि फक्त रणबीरचाच होता.

ठळक मुद्देरणबीर कपूर कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे आलियाच्या बर्थ डेचा प्लानही फिस्कटणार होता. पण रणबीरला तसे होऊ द्यायचे नव्हते.

काल 15 मार्चला आलिया भटचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. करण जोहरच्या घरी आलियाच्या बर्थ डेची झक्कास पार्टी रंगली. म्हणायला, या पार्टीत आलियाचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर हजर नव्हता. पण या सरप्राईज पार्टीचा प्लान मात्र फक्त आणि फक्त रणबीरचाच होता.

बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, करणच्या घरी पार्टीचा सर्व प्लान रणबीर कपूरचाच होता. आपल्या प्लानमध्ये त्याने करण जोहरला सामील केले होते. रणबीरने सगळे काही प्लान केले होते. कारणही तसेच होते. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी रणबीर कपूर आलियाला अशीच मोठ्ठे सरप्राईज पार्टी देणार होता. यासाठी त्याने खास तयारीही केली होती. पण अचानक काका राजीव कपूर यांचे निधन झाल्याने त्याचा हा प्लान फिस्कटला होता. व्हॅलेन्टाईन डेचा प्लान फिस्कटला होता. त्यामुळे आलियाच्या बर्थ डेसाठी रणबीरने दुस-यांना प्लान बनवला. अर्थात नियतीच्या मनात काही वेगळेच होते. यावेळी कोरोना आडवा आला.

रणबीर कपूर कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे आता आलियाच्या बर्थ डेचा प्लानही फिस्कटणार होता. पण रणबीरला तसे होऊ द्यायचे नव्हते. मग काय, करण जोहरने सगळचा मोर्चा सांभाळला आणि रणबीरचा प्लान तडीस नेला.काल आलियाच्या बर्थ डेला करणने शानदार पार्टी अरेंज केली होती. या पार्टीला दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शशांक खेतान, रोहित धवन, अयान मुखर्जी, आदित्य राय कपूर असे अनेक सेलिब्रिटी हजर होती. रणबीरही या पार्टीत हजर होता. अर्थात व्हिडीओ कॉलद्वारे. रणबीर कपूर पार्टीत नसल्यामुळे आलियाचा मूड तसाही खराब होता. पण तो व्हिडीओ कॉलद्वारे पार्टीत सहभागी होताच तिच्या चेहºयावर म्हणे आनंद पसरला.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट