सन १९४९ मध्ये राज कपूर आणि नर्गिस यांचा ‘बरसात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने अपार लोकप्रीयता मिळवली. या चित्रपटाचे पोस्टरही तुफान गाजले. राज कपूर यांच्या एका हातात व्हायोलिन आणि दुसऱ्या हातावर रेटलेली प्रणयधूंद नर्गिस हे पोस्टर प्रचंड लोकप्रीय झाले. इतकं की, राज कपूर यांनी आर. के. स्टुडिओच्या लोगोही तसाच बनवला.१९४० ते ६०च्या दशकात राज कपूर आणि नर्गिस यांच्या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. या दोन्ही कलाकारांनी जवळपास १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. कदाचित म्हणूनच आर. के. स्टुडिओच्या लोगोत नर्गिसने जागा मिळवली. पण आर. के. स्टुडिओच्या लोगोची कहाणी इतकीच नाही तर यापेक्षाही रोचक आहे.होय, जर्मनीचे महान कंपोजर व व्हायोलिनवादक बीथोवनने व्हायोलिनचा एक म्युझिक पीस बनवला होता. काळीज चिरत जाणारी ही ट्यून ऐकून महान लेखक लियो टॉलस्टॉय चांगलेच प्रभावित झाले. इतके की त्यांनी यावर एक लघुकादंबरीचं लिहिली. या कादंबरीत एक हृदयस्पर्शी प्रेमकथा होती. एक व्हायोलिनवादक एका महिलेवर जीवापाड प्रेम करतो. पण त्या महिलेला त्याचे दु:ख आणि त्याचे प्रेम समजून घ्यायला वेळ नसतो. तिचा तो कोरडा व्यवहार बनून तो व्हायोलिनवादक इतका व्यथित होतो की, सरतेशेवटी तिची हत्या करतो. टॉलस्टॉयच्या या लघुकादंबरीला रशियात बॅन करण्यात आल. पण जगभरात ही कादंबरी वाचली गेली.
१९ व्या शतकात फ्रान्सच्या एका आर्टिस्टने ही कादंबरी वाचली आणि त्याने त्या कादंबरीतील व्हायोलिनवादक आणि त्या महिलेचे चित्र चितारले. विशेष म्हणजे, बीथोवनने बनलेली ती आर्त ट्यून, लिओ टॉलस्टॉसने लिहिलेली लघुकादंबरी आणि फ्रान्सच्या त्या चित्रकाराने काढलेले पेन्टिंग सगळ्यांचे नाव एकचं होते, ते म्हणजे, रूत्जर सोनाटा.
असे म्हणतात की, राज कपूर यांनी हे पेन्टिंग पाहिले होते आणि ‘बरसात’च्या पोस्टरमध्ये त्यांनी तसाच काहीसा प्रयोग केला. हेच पोस्टर पुढे आ. के. स्टुडिओचा लोगो बनले.आर. के.स्टुडिओच्या लोगोची ही कथा सांगण्यामागचे कारण म्हणजे, लवकरच आर के स्टुडिओ इतिहासजमा होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओच्या आता केवळ स्मृती उरणार. होय, कपूर भावंडांनी अनेक अजरामर चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या या स्टुडिओला विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न तुलनेने कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्चच जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.