...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:49 AM2019-04-09T09:49:31+5:302019-04-09T09:56:30+5:30
उरी सिनेमातील ‘हाऊ इज द जोश’ या डायलॉगने नव्या इतिहास लिहिला. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’सिनेमातील हा डायलॉग सुपरडुपर हिट झाला.
उरी सिनेमातील ‘हाऊ इज द जोश’ या डायलॉगने नव्या इतिहास लिहिला. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’सिनेमातील हा डायलॉग सुपरडुपर हिट झाला. सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत पोहोचला. अगदी राजकारण्यांमध्येही ‘उरी’चा हा संवाद लोकप्रिय झाला.
किंबहुना या डायलॉगमुळे हा सिनेमा हिट ओळखला जाऊ लागला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र हा डायलॉग सिनेमात विकी कौशलला नको होता. होय, दिग्दर्शक आदित्य धरने याबाबतचा खुलासा केला आहे.
आदित्यने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ''आम्ही उरीचे म्यानमारमध्ये शूटिंग करत होतो. कॅमेरा रोल होण्यासाठी दोन मिनिटं असताना विक्की कौशल माझ्याकडे आला आणि त्यांने मला हा डायलॉग बदलण्यास सांगितले. विक्की म्हणाला हा डायलॉग फिल आणि जोश येत नाही. मात्र मी विकीला समजावले की जवानांमध्ये जोश येण्यासाठी अशा लाईन्स आर्मी अधिकारी सरावाच्या दरम्यान वापरत असतात. त्यामुळे तू प्रयत्न कर.'' पुढे तो म्हणाला, विक्की हा डायलॉग म्हणाला आणि तिथं उपस्थित 30 जणांच्या अंगावरे शहारे आले.
या संवादाची कल्पना अखेर कुठून आली? कशी आली? यामागेही आदित्याचा एक किस्सा आहे. आदित्य लहान असताना अनेकदा आर्मी क्लबमध्ये जायचा. याठिकाणी एक माजी ब्रिगेडियर यायचे. ते लहान मुलांना पाहून हा डायलॉग म्हणायचे आणि त्यांच्या हातात चॉकलेट असायचे. ‘हाऊ इज द जोश?’ असे ते विचारायचे. यावर ही लहान मुलं ‘हाई सर’, असे उत्तर द्यायचो. ज्याचा आवाज सगळ्यात तगडा असायचा, त्याला ते चॉकलेट मिळायचे. आदित्य अगदी छाती फाडून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचो आणि दरवेळी चॉकलेट त्यालाच मिळायचे. आदित्यने ‘उरी’त हाच डायलॉग वापरला. हा डायलॉग इतका गाजेल, इतका लोकप्रिय होईल, याची कदाचित त्यालाही कल्पना नसावी.