Join us  

हृतिक उघड करणार कंगनाचा खोटारडेपणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2016 12:50 PM

कंगनासोबत असलेल्या वादात वडील राकेश रोशन यांचा उल्लेख केल्याने हृतिक दुखावला गेला असून त्याने हा वाद संपुष्टात आणायचे ठरविले ...

कंगनासोबत असलेल्या वादात वडील राकेश रोशन यांचा उल्लेख केल्याने हृतिक दुखावला गेला असून त्याने हा वाद संपुष्टात आणायचे ठरविले आहे. लवकरच कंगनाचा खोटारडेपणा हृतिक उघड करणार असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी राकेश रोशन यांनी कंगना-हृतिकच्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. ‘सत्य लवकरच सर्वांच्या समोर येईल’ असे ते म्हणाले होते. चेतन भगतच्या पुस्तक विमोचन कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कंगनाने हृतिकच्या वडिलांचा उल्लेख करून आक्षेप नोंदविला होता. ‘‘हृतिकला स्वत:चा बचाव करता येत नाही. तो 43 वर्षांचा असला तरी त्याचा बवाच करण्यासाठी वडिलांना (राकेश रोशन) समोर यावे लागते’’ असे ती म्हणाली होती. एका दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हृतिक व त्याच्या वकिलांची चमू, कंगना विरुद्ध पुरावे गोळा करीत आहेत.या वादाचे पुरावे इंटरनेटवरून शोधून पुढिल कार्यवाही निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कंगनाने आतापर्यंत दडविलेले सत्य सर्वांसमोर यावे हा यामागील हेतू असल्याचे सांगण्यात येते. यामाध्यमातून हृतिक निरपराधी असल्याचे स्पष्ट होणार आहे, असेही सांगण्यात येते. कंगना-हृतिक वादाच्या सरुवातीपासूनच हृतिक रोशन आपली बाजू अद्याप स्पष्टपणे मांडू शकला नाही. दरम्यानच्या काळात तो मोहेंजोदरो व काबीलच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. हृतिकच्या एका मित्रांने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘आता हा वाद त्याला आणखी लांबवायचा नाही. हृतिकच्या मते आधुनिक काळात लिंगभेदाहून केली जाणारी टीका युद्धापेक्षा कमी नाही. स्त्री व पुरुषात असलेला लैंगिक अंतर हे या वादाचे मूळ आहे. अशा वादात नेहमीच पुरुषांना दोष दिला जातो. यात स्त्रियांही तितक्याच दोषी असतात, हे कुणीच ग्राह्य धरत नाही. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना स्त्री अत्याचाराला सामोरे जावे लागते, यात माझाही समावेश आहे असे हृतिकला वाटू लागले आहे’’. दुसरीकडे कंगना-हृतिकच्या वादात काहीच तथ्य नसल्याचे सांगण्यात येते. दोघांमध्ये प्रोफेशनल रिलेशन असून त्यांची अनेकदा एकमेकांसोबत भेट झाली आहे. जर त्याच्या जवळ पुरावे असतील तर त्याने ते आतापर्यंत का दाखविले नाही, असाही प्रश्न केला जात आहे. विशेष म्हणजे, मोहेंजोदरोच्या अपयशानंतर खचलेल्या हृतिकला ‘पापा राकेश रोशन’ यांच्या ‘काबील’ चित्रपटाकडून  बºयाच अपेक्षा आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर दीवाळीत रिलीज होणार आहे तोपर्यंत हा वाद मिटलेला असेल असे दिसते.