Join us

हृतिक रोशनच्या शाळेत शिकला, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार; फोटोतील या अभिनेत्याला ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 13:00 IST

हृतिक रोशनचा क्लासमेट होता हा सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, तुम्ही ओळखलं का?

आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांचं लाइफस्टाइल, वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना माहिती हवी असते. अनेक सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपला फेव्हरेट अभिनेता किंवा अभिनेत्री लहानपणी कशी दिसायची याचीही चाहत्यांना उत्सुकता असते. आता सध्या दोन बॉलिवूड अभिनेत्यांचा शाळेतील फोटो व्हायरल झाला आहे. 

एका X अकाऊंटवरुन हा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. हृतिक रोशनच्या शाळेतील हा फोटो आहे. हृतिकने मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं आहे. त्याच्याबरोबर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताही शिकत होता. हृतिकच्या शाळेतील फोटोमध्ये हा बॉलिवूड अभिनेताही दिसत आहे. पण, त्याला ओळखणंही कठीण जात आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जॉन अब्राहम आहे. हृतिकबरोबरच जॉन अब्राहमनेदेखील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. जॉन अब्राहम हा हृतिकचा क्लासमेट होता. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम स्कूल युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांच्या वर्गातील इतर मुलेही आहेत. तर त्यांचे शिक्षकही फोटोत दिसत आहे. फोटोत वरुन दुसऱ्या रांगेत हृतिक रोशन उभा आहे. तर त्याच्या खालच्या रांगेत कोपऱ्यात जॉन अब्राहम दिसत आहे. हृतिक आणि जॉन दोघेही शाळेच्या गणवेशात खूप क्यूट दिसत आहेत. 'पठाण' सिनेमात ते दोघेही एकत्र काम करताना दिसले होते.  

टॅग्स :हृतिक रोशनजॉन अब्राहम