Join us  

Vikram Vedha: हृतिक-सैफमध्ये रंगणार चोर-पोलिसाचा डाव; 'विक्रम वेधा'चा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 11:51 AM

अवघ्या काही काळापूर्वी प्रदर्शित झालेला हा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेता सैफ अली खानदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) याच्या विक्रम वेधा (Vikram Vedha ) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. मध्यंतरी या चित्रपटातील हृतिकचा फर्स्ट लूक समोर आला होता. तेव्हापासून नेटकऱ्यांमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरु झाली होती. इतकंच नाही तर या चित्रपटाविषयीचे नवनवीन अपडेट दररोज प्रेक्षकांना मिळत होते. यामध्येच आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

अवघ्या काही काळापूर्वी प्रदर्शित झालेला हा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेता सैफ अली खानदेखील (Saif Ali Khan) स्क्रीन शेअर करणार आहे. प्रदर्शित झालेला टीझर १ मिनीट ५४ सेकंदाचा असून यात चित्रपटाची हलकीशी झलक दाखवण्यात आली आहे.

प्रदर्शित झालेला टीझर पाहाता या चित्रपटात अॅक्शन आणि थ्रिलरला भरणा करण्यात आल्याचं दिसून येतं. हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान याने पोलिस अधिकारी विक्रम ही भूमिका साकारली आहे. तर, हृतिक  गँगस्टर वेधाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विक्रम, वेधाला पकडतो आणि तेथून चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. वेधा आपली कथा सांगत असताना विविध पैलू उलगडत जातात आणि विक्रमला वास्तवतेचे दर्शन घडते.

दरम्यान, विक्रम वेधा या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. तर, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी 'विक्रम वेधा' हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सिनेमाहृतिक रोशनसैफ अली खान बॉलिवूड