Join us

पुन्हा एकत्र येणार का हृतिक रोशन अन् सुजैन खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 20:48 IST

हृतिक रोशन आणि सुजैन खान आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ इच्छितात. होय, २०१४ मध्ये हृतिक व सुजैन यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. 

हृतिक रोशन आणि सुजैन खान आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ इच्छितात. होय, २०१४ मध्ये हृतिक व सुजैन यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. अर्थात या घटस्फोटानंतरही मुलांवर याचा परिणाम होऊ द्यायचा नाही, असे हृतिक व सुजैनने ठरवले होते. यानंतर झालेही असेच. पती-पत्नीचे नाते संपले पण मित्र बनून हृतिक व सुजैन दोघेही मुलांसाठी एकत्र आले. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनाही आपल्यातील मतभेद दूर ठेवले. त्यामुळेच गत तीन वर्षांत हे मित्र अनेकदा एकत्र दिसले. पार्टीमध्ये, फॅमिली गेट-टू-गेदर, डिनर, व्हॅकेशन्स सगळे एकत्र एन्जॉय करतानाही त्यांना पाहिले गेले. पण कदाचित इतके पुरेसे नव्हते. मुलांना ख-या अर्थाने आपले आई-बाबा हवे होते. होय, काळासोबत हृतिक व सुजैन दोघांनाही याची जाणीव झाली असावी. कदाचित याच जाणीवेपोटी हृतिक व सुजैन पुन्हा एकत्र येण्याबद्दल विचार करू लागले. होय, टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या मुलांसाठी हृतिक व सुजैन या दोघांनी पुन्हा लग्न करण्याचा विचार चालवला आहे.हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमी गत जानेवारीतही कानावर आली होती. अर्थात दोघांनीही यावर बोलणे टाळले होते. आत्ताही या बातमीवर बोलणे हृतिक व सुजैन टाळताना दिसताहेत. पण आता कदाचित दोघांच्याही मनाची तयारी झाली आहे.

कहो ना प्यार है चित्रपट रिलीज झाल्यानंतर ऋतिकने आपले पहिले प्रेम सुझैनसोबत 2000 साली लग्न केले होते. मात्र दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर 14 वर्षांनी ते वेगळे झाले होते. 2014 मध्ये ऋतिक आणि सुझैनने घटस्फोट घेतला होता. 

टॅग्स :हृतिक रोशन