ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 11:55 AM2018-08-18T11:55:52+5:302018-08-18T11:58:50+5:30
यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या आगामी अॅक्शन सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. ऋतिक रोशनने आपल्या अकाऊंटवर फोटो शेअर करुन ही माहिती दिलीय.
यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या आगामी अॅक्शन सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. ऋतिक रोशनने आपल्या अकाऊंटवर फोटो शेअर करुन ही माहिती दिलीय. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसतायेत. विशेषत: टायगर श्रॉफ ऋतिक रोशनपासून खूपच इन्स्पायरदेखील आहे असेही सांगितले जाते. टायगरने ऋतिककडून प्रेरणा घेऊनच अभिनयात पदार्पण केल्याचे सांगतो. मिळालेल्या माहितीनुसार ऋतिक आणि टागयर यात गुरु-शिष्याच्या जोडीत दिसणार आहे. रिपोर्टनुसार ह्रतिक रोशनच्या अपोझिट वाणी कपूर दिसणार आहे. या सिनेमाचे नाव काय असणार याबाबतचा खुलासा अजून झालेला नाही. सिद्धार्थ आनंद या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमातील अॅक्शन सीन्स जबरदस्त बनवण्यासाठी इंटरनॅशनल स्टंट कॉरियोग्राफरला बोलवण्यात आले आहे. सिनेमाचे शूटिंग भारतासह इटली, जॉर्जिया, पुर्तगाल, आबु-धाबी आणि स्विडनमध्ये होणार आहे. सिनेमा 2020च्या फेब्रुवारी महिन्यांपर्यंत रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.
And people thought it was a 2 hero film. Journey begins #HrithikvsTiger@iTIGERSHROFF#sidanandpic.twitter.com/d0CEBqEbdt
— Hrithik Roshan (@iHrithik) August 17, 2018
टायगर करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. सिनेमात अनन्याची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. तर ऋतिक सध्या 'सुपर ३०' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारात सुपर ३०' नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.