Join us

हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान पुन्हा प्रेमात? या अभिनेत्याला करतेय डेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 17:45 IST

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान पुन्हा चर्चेत आहे. सध्या सुजैनच्या रिलेशनशिपच्या चर्चांना ऊत आला आहे.

ठळक मुद्देसुजैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा केला होता.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान पुन्हा चर्चेत आहे. सध्या सुजैनच्या रिलेशनशिपच्या चर्चांना ऊत आला आहे. होय, सुजैन ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ व अभिनेता अर्सलान गोनीला डेट करत असल्याचे मानले जात आहे. पिंकविला या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून अर्सनल व सुजैन एकमेकांच्या संपर्कात असल्याचे आणि काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

सुजैनच जवळच्या व्यक्तिच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तानुसर, काही कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून सुजैन-अर्सनल यांची भेट झाली होती. हे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. देहबोलीवरून या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा वेगळे नाते असल्याचे स्पष्टपणे दिसते. आता ही चर्चा किती खरी, ते येणा-या दिवसांत कळेलच. तूर्तास तरी सुजैन व अर्सनल यांनी यावरही काहीही वक्तव्य केलेले नाही.

मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी चर्चा होती. मात्र हृतिकने हे वृत्त फेटाळून लावले होते. आम्ही आता पुन्हा एकत्र येणे शक्य नाही, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले होते. सुजैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा केला होता. मात्र घटस्फोट झाल्यानंतर ही दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिले. दोघांना अनेक वेळा व्हॅकेशनवर आणि बर्थ डे पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले.

ह्रतिकने 2000 मध्ये ‘कहो ना प्यार है’मधून डेब्यू केल्यानंतर त्याचवर्षी लग्न केले होते. सुजैन आणि हृतिकची बॉन्डिंग ब-याचदा सोशल मीडियावरही पाहायला मिळते. हृतिक जेव्हा जेव्हा अडचणीत दिसतो तेव्हा सुजैनने सोशल मीडियावर त्याला सपोर्ट करताना दिसते. 

कोण आहे अर्सनलअर्सनल हा ‘बिग बॉस 14’ फेम अली गोनीचा भाऊ आहे. तो एक अभिनेत आहे. 2017 साली ‘जिया और जिया’ या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता.  अर्सलन लवकरच अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :सुजैन खानहृतिक रोशन