Join us

 इतके खास आहे हृतिक रोशनचे कुटुंब, अनेकांनी दिले इंडस्ट्रीत योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 12:37 PM

रोशन कुटुंबातील काहींनी निर्मिती क्षेत्र निवडले, काहींनी दिग्दर्शन तर काहींनी संगीतक्षेत्र तर काहींनी अभिनय. आज आम्ही संपूर्ण रोशन कुटुंबाबद्दल सांगणार आहोत.  

ठळक मुद्देसंजय खान यांचाही रोशन कुटुंबाशी संबंध आहे. हृतिकची एक्स वाईफ सुजैन खान हिचे ते वडिल. म्हणजेच हृतिकचे सासरे.

दीर्घकाळानंतर हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. ‘कहो ना प्यार है’ ते ‘सुपर 30’ अशा अनेक चित्रपटांतून हृतिकने आपल्या अभिनयाची छाप सोडली. हृतिकला कुटुंबाकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. रोशन कुटुंबातील काहींनी निर्मिती क्षेत्र निवडले, काहींनी दिग्दर्शन तर काहींनी संगीतक्षेत्र तर काहींनी अभिनय. आज आम्ही संपूर्ण रोशन कुटुंबाबद्दल सांगणार आहोत.  

राकेश रोशन

हृतिकचे वडील राकेश रोशन फिल्म इंडस्ट्रीत दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. आंखों आंखों मे, खेल खेल में, त्रिमूर्ती, खूबसूरत, खट्टा मीठा, कामचोर, खून भरी मांग अशा अनेक चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. यानंतर ते दिग्दर्शनात उतरले. खुदगर्ज, किंग अंकल, कहो ना प्यार है, क्रिश असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत.

राजेश रोशन

राजेश रोशन हे हृतिकचे काका. राजेश यांनी संगीत क्षेत्रात नाव कमावले. फिल्म इंडस्ट्रीला त्यांनी एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी दिलीत. यात खुदगर्ज, कहो ना प्यार है आणि काईट्स सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

रोशनलाल नागरथ (रोशन)

हृतिक रोशनचे आजोबा बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते. चित्रलेखा, अनोखी रात, ताज महाल, बरसात अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

जय ओम प्रकाश

हृतिकचे आजोबा (आईचे वडील) जय ओम प्रकाश एक मोठे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. आप की कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है, अपनापन, आंधी, गेट वे आॅफ इंडिया अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

संजय खान

संजय खान यांचाही रोशन कुटुंबाशी संबंध आहे. हृतिकची एक्स वाईफ सुजैन खान हिचे ते वडिल. म्हणजेच हृतिकचे सासरे. दोस्ती, एक फूल दो माली, मेला, बाबुल की गलियां, धुंध, नागीन अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले.

टॅग्स :हृतिक रोशन