‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyar Hai) हा हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) पहिला सिनेमा. यात हृतिकची हिरोईन होती अमीषा पटेल (Amisha Patel). हृतिकचा पहिलाच डेब्यू सिनेमा सुपरडूपर हिट झाला आणि हृतिक व अमीषा दोघंही एकारात्रीत स्टार झालेत. पण तुम्हाला ठाऊक आहे का, या चित्रपटासाठी सर्वप्रथम करिना कपूरला (Kareena Kapoor) साईन करण्यात आलं होतं. होय, अगदी करिनाने शूटींगही केलं होतं. पण आईचा एक हट्ट इतका की, करिनाला हाती घेतलेला हा सिनेमा सोडावा लागला होता.
2000 साली आजच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला ‘कहो ना प्यार है’ हा सिनेमा रिलीज झाल होता. 10 कोटींच्या या सिनेमानं सुमारे 80 कोटींची कमाई केली होती. या सिनेमासाठी राकेश रोशन यांनी करिनाला साईन केलं होतं. मुहूर्तानंतर वर्सोवाच्या कॉन्वेंट व्हिलामध्ये चित्रपटाचं शूटींगही सुरू झालं होतं. शूटींगच्या पहिल्याच दिवशी करिनावरचं एक गाणं चित्रीत होणार होतं. करिनाची आई बबीता व बहिण करिश्मा या दोघीही सेटवर हजर होत्या.
कोरिओग्राफरने मुद्दाम करिनाला सोप्या स्टेप्स दिल्या होत्या. कारण करिना पहिल्यांदा कॅमेरा फेस करत होती. पहिला दिन कसाबसा संपला आणि करिनाने काही डान्स स्टेप्स फायनल केलंत. पण इकडे करिना सेटवरून घरी पोहोचली आणि तिकडे बबीता यांचा राकेश रोशन यांना फोन गेला.
करिना पहिल्याच दिवशी डान्ससाठी कम्फर्टेबल नाहीये. त्यामुळे तुम्ही गाण्याऐवजी तिचे दुसरे सीन्स शूट करा, असं बबीता राकेश रोशन यांना म्हणाल्या. बबीताची हे शब्द ऐकून राकेश रोशन यांना धक्काच बसला. कारण गाण्याचा सेट तयार होता. त्यांनी बेबोच्या आईना समजवण्याचा प्रयत्न केला. करिनाला काहीही अडचण नाहीये. ती चांगलं काम करतेय, अशा शब्दांत त्यांनी दिलासा देण्याचाही प्रयत्न केला. पण बबीता ऐकायला तयार नव्हत्या. अचानक चर्चा वादात बदलली आणि बबीता अटीतटीवर आल्या. तुम्ही आधी गाणं शूट करणार असाल तर करिना या चित्रपटात काम करणार नाही. मी तिला हा सिनेमा करू देणार नाही, असं त्यांनी तावातावात सांगत फोन आपटला. यानंतर राकेश रोशन यांनी करिनाचे वडील रणधीर कपूर यांनाही समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचाही फायदा झाला नाही.
बबीतांनी थेट राकेश रोशन अनप्रोफेशनल डायरेक्टर ठरवलं. अखेर राकेश रोशन यांचाही नाईलाज झाला आणि त्यांनी करिनाऐवजी अमीषा पटेलला साईन केलं. अर्थात यामागचं खरं कारण त्यांनी कधीच सांगितलं नाही. कारण रणधीर कपूर त्यांचे चांगले मित्र होते.अर्थात या सगळ्या एपिसोडनंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2001 मध्ये करिना व हृतिक ‘यादें’ या चित्रपटात झळकलं. पण हा सिनेमा सुपरडुपर फ्लॉप झाला. नंतर ही जोडी ‘कभी खुशी कभी गम’, मुझसे दोस्ती करोगे, मैं प्रेम की दीवानी हूं या चित्रपटाही झळकली.