Join us

'आमच्यामुळे तुम्ही आहात'; सेल्फीसाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयला हृतिकच्या बॉडीगार्डने दिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 16:30 IST

Hrithik roshan: सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावलेल्या डिलिव्हरी बॉयला हृतिकच्या बॉडीगार्डने जोरात धक्का दिला. विशेष म्हणजे हृतिक हे सारं काही पाहत होता मात्र तरीदेखील त्याने बॉडीगार्डला अडवलं नाही.

बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून अभिनेता हृतिक रोशनकडे (Hrithik roshan) पाहिलं जातं. उत्तम अभिनय, डान्स स्टाइल, फिटनेस आणि चार्मिंग लूक यामुळे हृतिक कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. त्यामुळे हृतिक कधीही कुठे दिसला की चाहते त्याच्यासोबत एक फोटो घेण्यासाठी धडपड करतात. मात्र, हृतिकच्या एका चाहत्याला त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा वाईट अनुभव आला आहे. सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावलेल्या डिलिव्हरी बॉयला हृतिकच्या बॉडीगार्डने जोरात धक्का दिला. ज्यामुळे हृतिक सध्या ट्रोल होत आहे.

अलिकडेच हृतिक रोशन, एक्स वाइफ सुझान खान आणि तिचा प्रियकर अर्सलान गोनी एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले होते. या रेस्टॉरंटमधून हृतिक बाहेर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या बाजूला गर्दी केली. यात एक डिलिव्हरी बॉयदेखील उभा होता. हृतिकला पाहिल्यानंतर हा डिलिव्हरी बॉय सेल्फीसाठी पुढे आला. मात्र, हृतिकच्या बॉडीगार्डने त्याला जोरात मागे खेचलं. इतकंच नाही तर हृतिक हे सारं काही पाहत होता. परंतु, तो एका शब्दाने काही बोलला नाही. परिणामी, लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

'तुम्ही लोक आमच्यामुळे आहात आणि गरीब माणसाला धक्का कसा काय दिला. स्वतःला काय समजतात?' असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'यांचे चित्रपटच पाहायला नको. भावा असा काय अॅटिट्यूड की त्या बिचाऱ्याला धक्का दिला', असं म्हणत नेटकऱ्यांनी हृतिकला खडे बोल सुनावले आहेत.

दरम्यान, हृतिक लवकरच फायटर या सिनेमात झळकणार आहे. याचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. तसंच हृतिकसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडसेलिब्रिटी