मिलेनियल सुपरस्टार हृतिक रोशन याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, जगातील ‘मोस्ट हॅण्डसम’ पुरूष म्हणून त्याची निवड झाली आहे. ग्रीक गॉड म्हणून ओळखल्या जाणा-या हृतिकच्या लूकची क्रेज भारतातच नाही जगभर आहे. आता ‘ Most Handsome Men in the world in August 2019’ या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. यादीत हृतिकचे नाव अग्रस्थानी असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात येतोय.
लवकरच हृतिक ‘वॉर’ या अॅक्शन थ्रीलर चित्रपटात दिसणार आहे. यात हृतिकशिवाय टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. डायरेक्टर सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात ऋतिक आणि टायगर जबरदस्त अॅक्शन करतांना दिसणार आहेत. ‘वॉर’ हा पहिला असा चित्रपट आहे जो आर्कटिक सर्कलमध्ये शूट केला गेला आहे. या चित्रपटाच्या टीजरमध्ये खतरनाक स्टंट्स आणि अॅक्शन सीन्स दाखवले गेले आहेत. ऋतिक आणि टायगरचा एक फाइट सीन फिनलँडमध्ये शूट झाला आहे. तो बर्फावर चालणाºया एका एड्रिनालाइन पम्पिंग कारसोबत चित्रित केला गेला आहे. फिनलँडचा हा भाग आर्कटिक सर्कलमध्ये येतो.